Nashik News : दप्तराचे ओझे कमी होईना! शासनाने निश्चित केलेल्या भारापेक्षा दुप्पट भार वाहतात विद्यार्थी

Students carry twice load as prescribed by government nashik news
Students carry twice load as prescribed by government nashik newsesakal

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कायम आहे.

नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा दुपटीहून अधिक असल्याचे चित्र आहे. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना पाठीचे, मणक्याचे आजार जडत आहेत.

सरकारने विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासाठी २०१५ मध्ये उपाययोजना जाहीर केल्या. काही शाळांनी विविध प्रयोग केले. (Students carry twice load as prescribed by government nashik news)

या वर्षी पाठ्यपुस्तकात कोरी पाने जोडून दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले का, याची पाहणी शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये नियमितपणे झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षण विभागाने दप्तराचे वजन करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे. याचा अहवाल दरमहा शिक्षण विभागाला सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. परंतु अधिकारी शांळामध्ये जाऊन पाहणी करण्याऐवजी कागदोपत्री अहवालावर समाधान मानत आहेत. लहान वयात जड दप्तर वाहून नेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठीचे, मणक्याचे आजार जडत असल्याची माहिती वैद्यकीय तपासणीतून पुढे आली आहे.

पाठीवरचे थोडे ओझे हातात...

दप्तरात वह्या, पुस्तके, कंपास, वर्कबुक या साहित्यासोबत जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली असते. हे ओझे हलके करण्यासाठी मुलांना डबा आणि पाण्याची बाटली बास्केटमध्ये घेऊन येण्याचा आदेश काही शाळांनी दिला. यामुळे पाठीवरचे थोडे ओझे हातात आले आहे.

दप्तराचे वजन वाढविणारे साहित्य..* एकापेक्षा अधिक पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्य * एकाच विषयाला एकापेक्षा जादा वह्या * प्रॅक्टिकलचे साहित्य * चित्रकला, कार्यानुभ व प्रोजेक्टचे साहित्य.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Students carry twice load as prescribed by government nashik news
NMC News : मुख्यालयात अधिकाऱ्यांचे उत्तरायण-पूर्वायन; महापालिकेत वास्तुशास्त्राप्रमाणे आसनव्यवस्थेचा अधिकार

दप्तराच्या ओझ्यामुळे होणार परिणाम...* पाठीचा मणका आणि सांध्यावर परिणाम * पाठीच्या मणक्याचा आकार बदलणे * मणक्याच्या चकतीची झीज होणे * पाठ, मान, खांदेदुखीचा त्रास

"आधीच्या दप्तराचे ओझे कमी झाले आहे. मात्र आहे ते ओझेही विद्यार्थ्यांना झेपणारे नाही. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अजून उपाययोजना करायला हव्यात." - सरोज पाटील, निवृत्त मुख्याध्यापिका, कन्या विद्यालय, पिंपळगाव

दप्तराचे अपेक्षित आणि प्रत्यक्षात वजन

इयत्ता अपेक्षित वजन सध्याचे वजन

पहिली ते दुसरी १.५ किलो ४ ते ५ किलो

तिसरी ते पाचवी २.३ किलो ५ ते ७ किलो

सहावी ते सातवी ४ किलो ६ ते ८ किलो

आठवी ते नववी ४.५ किलो ७ ते ९ किलो

दहावी ५ किलो ७ ते १० किलो

Students carry twice load as prescribed by government nashik news
Nashik Water Scarcity : भर पावसाळ्यात 60 टँकरने पाणीपुरवठा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com