Crime News : पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयितास अटक; घोटी पोलिसांची करमाळ्याला जात कारवाई

Crime News : पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयितास अटक; घोटी पोलिसांची करमाळ्याला जात कारवाई

Nashik Crime : घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिकनगर रेल्वेस्थानक परिसरातील एका अल्पवयीन अकरा वर्षीय बालिकेला शाळेतून घरी जात असताना संशयिताने तोंड दाबून फरफटत नेत असातना नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिची सुटका करण्यात आली.

घोटी पोलिस ठाण्यात संशयितांवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात झाला असून पोलिसांनी त्याला थेट सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतला आहे. संकेत मोतीराम आंबेकर (३२, रा. रामरावनगर, घोटी) असे त्याचे नाव आहे. (Suspect in POCSO crime arrested nashik crime news)

घटनेनंतर संशयित आरोपीविरधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्याला पोलिसांनी करमाळा (जि. सोलापूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. संकेत आंबेकर याने अल्पवयीन मुलीला बळजबरीने अत्याचाराच्या इराद्याने फरफटत निर्जन ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी नागरिकांनी त्याला पहिले.

सर्व नागरिकांनी पाठलाग करत मुलीची सोडवणूक केली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी पथक तयार करून सहाय्यक निरीक्षक संदेश पवार, पोलिस हवालदार सागर सौदागर, पोलिस कॉन्स्टेबल योगेश यंदे यांना तपासासाठी पाठविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News : पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयितास अटक; घोटी पोलिसांची करमाळ्याला जात कारवाई
Nashik Crime: स्विफ्टमधून विदेश मद्याची अवैध वाहतूक; अंबोली फाट्यावर एक्साईजची कारवाई

संशयित हा करमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जाऊन त्याला अटक केली. संशयित हा पत्नीपासून वेगळा राहत असून त्याने अनेकदा महिला व मुलींची छेड काढल्याचे प्रकार केल्याचे तपासात आढळून आले आहे. सहाय्यक निरीक्षक संदेश पवार तपास करत आहेत.

"घोटी पोलिस ठाणे हद्दीतील महाविद्यालय, शाळा कॉलेज अथवा परिसरात कोणत्याही महिला अथवा युवती, मुलीवर पाळत ठेवून छेड काढणे, त्रास देणे असे प्रकार दिसत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. शाळा, महाविद्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने भेटी देणार आहे." - विनोद पाटील, पोलिस निरीक्षक, घोटी.

Crime News : पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयितास अटक; घोटी पोलिसांची करमाळ्याला जात कारवाई
Nashik Crime: मॉर्निंग वॉकदरम्यान महिलेवर हल्ला; सोन्याची चैन, मोबाईलची लूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com