Nandurbar News : मद्यपी वाहन चालकांविरूद्ध पोलिसांची धडक कारवाई; सर्वत्र स्वागत!

police cheaking
police cheakingesakal

Nandurbar News : बेधुंद होऊन बेदरकारपणे वाहन चालविल्याने होणारे अपघात व त्यातील मृत्यूंची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यासाठी पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांविरूद्ध रविवारी (ता. ९) दिवसभर मोहीम राबविली. (Police action against drunk driver case filed against 36 people nandurbar news)

त्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ३६ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मद्यपिंच्या आतताईपणामुळे अनेक निष्पापांचा जीव गेलेला असल्याने पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे.

पोलिस अधिक्षक पी. आऱ. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अपघातांच्या प्रमाणाचा आढावा घेत त्यामागील कारणेही जाणून घेतली. त्यात रस्त्यांची दयनीय अवस्था हेही मुख्य कारण असले, तरी दुचाकी चालकांच्या अपघाती मृत्यूच्या घटनांत सर्वाधिक वाहनचालक हे मद्यपी असल्याचे आढळून आले आहे.

अशा मद्यपी चालकांनी त्यांचा स्वतःचा व साथीदार किंवा ज्या वाहनाला धडक दिली अशा वाहनांवरील निष्पाप नागरिकांचाही जीव गमावल्याची अनेक उदाहारणे आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या वाढत्या समस्येबरोबरच सुरक्षित प्रवासासाठी व अपघात टाळण्यासाठी नशेत वाहने न चालविण्याचे आवाहन यापुर्वीही जिल्हा पोलिस प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

police cheaking
Unseasonal Rain Damage : सिन्नर तालुक्यात 366 हेक्टरमध्ये नुकसान; रब्बीसह भाजीपाला पिकांचा सहभाग

वेळोवेळी मद्यपी चालकांविरूद्ध मोहीम राबवून समजही देण्यात आली आहे. तरीही मद्यपी चालकांवर फारसा वचक बसलेला नाही. अशा पार्श्‍वभूमीवर रविवारी दिवसभर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत कारवाईची मोहीम राबविण्यात येऊन संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस ठाणेनिहाय गुन्हे

पोलिस ठाणे गुन्हे

अक्कलकुवा : ०२

मोलगी : ०१

धडगाव : ०२

नवापूर : ०७

विसरवाडी : ०४

उपनगर : ०३

नंदुरबार शहर : ०२

सारंगखेडा : ०२

तळोदा : ०२

म्हसावद : ०२

शहादा : १०

एकूण - ३६

police cheaking
Unseasonal Rain Damage : इगतपुरीच्या पूर्व भागात गारपिटीने शेतीचे नुकसान; घरांची मोठी पडझड

अनेकांचा परवाना रद्द

दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. पाटील यांनी जिल्ह्यात वाहतुक व्यवस्था सुधारावी, वाहन चालकांना शिस्त लागावी, कोणाचाही अपघाती मृत्यू होऊ नये, कोणाचेही कुटुंब उघड्यावर येऊ नये अशा उदात्त हेतुने वर्षभर मोहीम राबवून अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यात अनेक वाहन चालकांचे लायसेन्स रद्दचे प्रस्ताव पाठवून त्यांचे वाहन परवाने रद्द केल्याचीही कारवाई मागील वर्षी केलेली आहे.

रस्ते दुरूस्तीसाठीही पुढाकार

जिल्हा पोलिस अधिक्षक पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्याचा पदभार स्विकारला, त्यावेळी जिल्ह्यातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी शहरासह परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याची पुढे आले होते.

त्यामुळे श्री. पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ यांच्यासह संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्त्यांची डागडुजी करून घेतली आहे. त्यांचा या कार्याचे मागील वर्षी सर्वत्र कौतुक झाले होते.

police cheaking
Unseasonal Rain Damage : 30 एकरातील बागा आडव्या; शंभर एकरापेक्षा जास्त क्षेत्राला फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com