Nandurbar News : फिरत्या संग्रहालयाच्या बसचे आगमन; शाळांमधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती

Principal Sheetal Mahajan and students inspecting various ornaments and objects in the mobile museum.
Principal Sheetal Mahajan and students inspecting various ornaments and objects in the mobile museum. esakal

Nandurbar News : अध्यापक शिक्षण मंडळ, धुळे संचालित येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयात फिरत्या संग्रहालयाच्या बसचे (म्युझियम ऑन व्हील्स) नुकतेच आगमन झाले.

या वेळी फिरत्या शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून महाजन हायस्कूलमधील तसेच परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती देण्यात आली. (Students in schools were given historical information through traveling Shivaji Maharaj Museum bus nandurbar news)

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार, तसेच गटसाधन केंद्र तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तुसंग्रहालयाच्या शतक पूर्तीनिमित्ताने विद्यार्थ्यांना विविध जतन केलेल्या वस्तूंची माहिती देण्यात येत आहे.

‘तुम्ही संग्रहालयात येऊ शकत नसाल, तर संग्रहालय तुमच्याकडे येईल’, या तत्त्वावर हे फिरते वस्तुसंग्रहालय राज्यांतील अनेक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत.

डायटचे अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयात फिरत्या संग्रहालयाचे आगमन झाले.

या वेळी प्रथम कै. प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे, सरस्वतीमातेचे पूजन व अभिवादन करून फिरत्या वस्तुसंग्रहालयाचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Principal Sheetal Mahajan and students inspecting various ornaments and objects in the mobile museum.
Nandurbar Kanumata Utsav : कानूमाता उत्सव काही दिवसांवर; कानूमाता मुखवटे निर्मितीत कारागीर व्यस्त

या वेळी प्राचार्य अमरदीप महाजन, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या शीतल महाजन, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. प्रवीण चव्हाण, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, विस्ताराधिकारी वसंत जाधव, केंद्रप्रमुख शांतिलाल पाडवी, केंद्रप्रमुख जगन्नाथ मराठे, विषयतज्ज्ञ शर्मिला चौधरी, विषयतज्ज्ञ नंदू पाटील, शाळेचे उपमुख्याध्यापक भास्कर माळी, पर्यवेक्षक अरुण महाजन, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. फिरत्या वस्तुसंग्रहालयाचे चिन्मय गावडे, गौरव जाधव, लोकायत हलकर, देवेश पाले, ओंकार डोंगरकर, अमर पाटील उपस्थित होते. सुनील सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

ऐतिहासिक वस्तू शाळेतच बघण्याचा अनुभव

विद्यार्थ्यांनी बसमधील संग्रहालयातील शिवकालीन नाणे (होन), दुर्मिळ पक्ष्यांची प्रतिकृती, पुरातन काळातील सोन्या-चांदीचे दागिने, हस्तीदंतापासून तयार केलेल्या वस्तू, उंटाच्या हाडापासून तयार करण्यात आलेली दागिने ठेवण्याची पेटी अशा पुरातन काळातील वस्तूंचे निरीक्षण केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले, की फिरत्या संग्रहालयाच्या माध्यमातून अनेक ऐतिहासिक वस्तू शाळेतच बघण्याचा अनुभव घेता आला. या वेळी परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Principal Sheetal Mahajan and students inspecting various ornaments and objects in the mobile museum.
Nandurbar News : दरा मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com