Nandurbar News : रस्ते दुरुस्त न केल्यास मोठ्या आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

congress movement
congress movementesakal

शहादा (जि. नंदुरबार) : शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय (Pathetic) झाली आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. (Taluka Congress organized road stop movement protestors warned of big protest in future if roads are not repaired nandurbar news)

रोजच लहान-मोठे अपघात होत असतात. राज्य व केंद्र सरकार ग्रामीण रस्त्यांकडे दुर्लक्ष का करते, असा सवाल करीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका काँग्रेसतर्फे म्हसावद-तोरणमाळ चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी येत्या काळात रस्ते दुरुस्त न केल्यास भविष्यात मोठे आंदोलन करण्याच्या इशाराही आंदोलकांनी दिला.

म्हसावद (ता. शहादा) येथील तोरणमाळ चौफुलीवर तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता रस्ता दुरुस्तीसाठी काँग्रेसतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील रस्त्यांची कित्येक वर्षापासून दयनीय अवस्था आहे. रस्त्यांची दुरुस्ती तसेच नूतनीकरण करण्यात आलेले नाही.

परिणामी दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

congress movement
Nashik Fraud Crime : Franchiseच्या नावाने साडेसात लाखांची फसवणूक

या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुभाष पाटील, शहादा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश निकम, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. योगेश पावरा, दिलीप पावरा, किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य सत्येन वळवी, अनिल कुवर, गोपी पावरा, विजय पावरा, जाधव ठाकरे, युवराज शेवाळे, गणेश पाटील,

प्रकाश पवार, मिलिंद अहिरे, ईश्वर पाटील आदींसह असंख्य पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी पी. बी. पावरा, पी. जी. वळवी यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यास विनंती केली. या वेळी म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निवृत्ती पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

congress movement
Teachers Transfer: जिल्हयात संवर्ग 4 मध्ये 800 शिक्षक बदलीस पात्र; यादी जाहीर, प्रत्यक्ष बदलीची प्रतीक्षा!

हे आंदोलन संपूर्ण तालुक्यातील गाव रस्त्यांपासून तर जिल्हा परिषद, राज्य रस्त्यांपर्यंतचे होते. खराब रस्त्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येत्या १५-२० दिवसांत तातडीने रस्ते दुरुस्त न झाल्यास काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालून तातडीने रस्त्यांची कामे करण्यास भाग पाडतील. -सुभाष पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष, काँग्रेस

दरा फाटा ते दरा हे अठरा किलोमीटरचे काम मंजूर असून, ते लवकरच सुरू होईल. तालुक्यातील इतर रस्त्यांच्या कामासाठी डिसेंबरच्या व मार्चच्या बजेटमध्ये काम टाकले होते; परंतु ते मंजूर झाले नाही. पुन्हा मार्चचा बजेटमध्ये लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने रस्त्यांचा कामांसाठी प्रयत्न करू.-पी. जी. वळवी, उपविभागीय अभियंता, सा.बां. विभाग, शहादा

congress movement
Dhule News : केंद्राच्या CTET परीक्षेनंतरच TAIT परीक्षा; बेरोजगारांना संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com