Dhule News : नगाव सेवा सोसायटी निवडणुकीत ‘मविआ’ पॅनलचा दणदणीत विजय

maha vikas aghadi panel
maha vikas aghadi panelesakal

धुळे : नगाव (ता. धुळे) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी व शेतमजूर विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर भदाणे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. (victory of maha vikas aghadi panel in Nagaon Seva Society election dhule news)

विजयी पॅनलमधील उमेदवारांचा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भाजपचे श्री. भदाणे, जिल्हा परिषदेचे सदस्य राम भदाणे यांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सत्तेला सुरुंग लावत महाविकास आघाडीच्या पॅनलने नगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेत पहिल्यांदा सत्ता स्थापन केली.

संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडी पॅनलच्या शेतकरी व शेतमजूर विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

maha vikas aghadi panel
Market Committee Election : उमेदवारीसाठी आर्थिक सक्षमता हवीच! बनकर-कदम गटाकडे इच्छुकांची लॉबिंग सुरू

निवडणुकीत प्रशांत भदाणे, रावण पाटील, रवींद्र पाटील, नवसाबाई पाटील, उषाबाई पाटील, निर्मलाबाई बैसाणे यांचा विजय झाला. या नवनिर्वाचित संचालकांचा मंगळवारी (ता. २८) धुळे ग्रामीणचे आमदार श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी आर. पी. पाटील, भाईदास पाटील,

ॲड. राहुल पाटील, मुकुंद पाटील, भटू पाटील, जगदीश पाटील, शिवदास पाटील, भगवान पवार, भगवान पाटील, अरुण पाटील, भटू राजधर पाटील, आप्पा पाटील, संजय पाटील, जगन्नाथ बैसाणे, प्रवीण थोरात, किशोर पाटील, संजय भदाणे, योगेश पाटील, सुरेश पवार, प्रवीण पाटील, नंदलाल भामरे, एस. एन. पाटील, महेश भदाणे आदी उपस्थित होते.

maha vikas aghadi panel
Nandurbar News : नवापूर पोलिसांनी पकडला गॅस सिलिंडरचा साठा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com