लाईव्ह न्यूज

Dhule News : शासन आपल्या दारी’ चा उद्देश सार्थ; लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

Mukti (Dhule): Under the government's Dari initiative, Zilla Parishad Chairperson Ashwini Patil and other dignitaries gave the benefits of government schemes to the beneficiaries.
Mukti (Dhule): Under the government's Dari initiative, Zilla Parishad Chairperson Ashwini Patil and other dignitaries gave the benefits of government schemes to the beneficiaries.esakal
Updated on: 

Dhule News : गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोचल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून शासनाचा हेतू सार्थ ठरला असल्याची भावना धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासनातर्फे २३ एप्रिल २०२३ पासून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकटी (ता. धुळे) येथे शुक्रवारी (ता. ९) सकाळी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. (Zilla Parishad Chairperson Ashwini Patil say purpose of shasan aplya dari yojna complete Benefits of schemes to beneficiaries in Mukti Dhule News)

जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, मुकटीच्या सरपंच मंगलाबाई पारधी, उपसरपंच आशा पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र शर्मा, पंचायत समितीचे माजी सदस्य भगवान चौधरी, पंढरीनाथ पाटील, मार्केट कमिटीचे संचालक बबलू पाटील, माजी सरपंच गुलाबराव पाटील, रोहिदास पाटील, भिरडानेचे सरपंच राजेश पाटील, सावळीचे सरपंच पृथ्वीराज पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी वाघ, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी, बालविकास प्रकल्प अधिकारी चौधरी, नायब तहसीलदार पवार, श्री. भामरे, श्री. राजपूत, श्री. येवले, श्री. मगर, उपनिबंधक कार्यालयाचे श्री. वीरकर, मंडळ अधिकारी विजय पाटील, जितेंद्र बांगर, दत्ता लहामगे, श्री. अहिरराव, एस. जी. सूर्यवंशी, श्री. सामुद्रे, श्री. शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी प्रा. जाधव यांनी शासनाने मदतीचा हात पुढे केल्यानंतर लाभार्थ्यांनीदेखील हात पुढे केला तर शासन आणि लाभार्थी यांच्या संयुक्त योगदानातून सर्वसामान्यांचा विकास होऊ शकणार आहे, असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mukti (Dhule): Under the government's Dari initiative, Zilla Parishad Chairperson Ashwini Patil and other dignitaries gave the benefits of government schemes to the beneficiaries.
Dhule News : शेतीपंपाच्या रोहित्रांची दुरवस्था; शेतकऱ्यांकडून रोहित्रांची स्वखर्चातून दुरुस्ती

लाभार्थ्यांना वस्तू, दाखलेवाटप

शासनाच्या वेगवेगळ्या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अध्यक्षा श्रीमती पाटील यांच्या हस्ते विविध वस्तू व इतर लाभांचे वाटप करण्यात आले.

लहान, मोठे ट्रॅक्टर, बहुपीक मळणीयंत्र, चाफ कटर, झेरॉक्स मशिन, विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके, सायकल, दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र व यूआयडी कार्ड, मजुरांना जॉब कार्ड, दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्य अनुदान, बेबी केअर किट, संजय गांधी निराधार योजना, भूमिअभिलेख विभागामार्फत विविध दाखले लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

मंडळ अधिकारी सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी तलाठी टी. ए. पिंजारी, श्री. चव्हाण, हर्षा भोगले, श्रीमती वाघ, तलाठी श्री. परदेशी, तलाठी श्री. चौधरी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Mukti (Dhule): Under the government's Dari initiative, Zilla Parishad Chairperson Ashwini Patil and other dignitaries gave the benefits of government schemes to the beneficiaries.
Dhule News : कामे सोडून अफवांना बळी पडू नका; जिल्हाधिकारी जलज शर्मांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com