विद्यापीठानंतर कुणी घेतला अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय?

मंगेश गोमासे
Thursday, 17 September 2020

सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचनांचे पालन करून लेखी परीक्षा घेण्यात येईल. काही अपरिहार्य कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्यास अशा विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येईल. दिव्यांगांसाठी अधिक वेळ आणि सुविधा देण्यात येईल.

नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी आणि फार्मसी पदविका अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. या परीक्षेचे निकाल ३१ ऑक्टोबरला घोषित करण्यात येईल. दुसरीकडे सदर येथील शासकीय तंत्रनिकेतन या स्वायत्त महाविद्यालयातील नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहे. ३० ऑक्टोबरला निकालाची घोषणा करण्यात येणार आहे. बॅकलॉगच्या परीक्षा १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई)ने अभियांत्रिकी आणि फार्मसी पदविका अभ्यासक्रमातील वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा, बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान तर नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ५ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होईल.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

याशिवाय सदर येथील शासकीय तंत्रनिकेतन या स्वायत्त महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार अंतिम आणि नियमित विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २१ ते २८ सप्टेंबरला होणार आहेत. याशिवाय अंतिम वर्षातील बॅकलॉगच्या परीक्षा १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान होतील.

अंतिम वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० ते २४ ऑक्टोबरदरम्यान होतील. प्रात्यक्षिक परीक्षा विभागस्तरावर ऑनलाइन पद्धतीने मौखिकरित्या घेण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नाहीत, त्या विद्यार्थ्यांना मोबाईल, दूरध्वनीद्वारे परीक्षा घेण्यात येतील. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी मौखिक परीक्षा दिली नाही, अशा त्यांचे टर्म वर्क, जनरल सबमिशन, कन्टीन्युअस असेसमेंटच्या आधारे प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षांचे गुण देण्यात येतील.

सविस्तर वाचा - सासऱ्याने जावयाची केली दहा लाखांची मदत; मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला कठोर निर्णय

ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि आयपॅड नाहीत, अशा विद्यार्थ्यांना नजीकच्या तंत्रनिकेतनमध्ये परीक्षा घेण्याची सुविधा उपलब्ध करून देईल. सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचनांचे पालन करून लेखी परीक्षा घेण्यात येईल. काही अपरिहार्य कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्यास अशा विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येईल. दिव्यांगांसाठी अधिक वेळ आणि सुविधा देण्यात येईल.

बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यु)
अंतिम आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यु) देण्यात येणार आहेत. या परीक्षेत विद्यार्थ्यांना ४० प्रश्न सोडविण्यास देण्यात येणार असून एका तासात ३० प्रश्न सोडवावे लागणार आहेत.

हेही वाचा - सावधान! पायी जाणाऱ्या मुलींनो, जरा सांभाळून..काय आहे प्रकरण... वाचा सविस्तर

राज्यातील अभियांत्रिकी आणि फार्मसी पदविका अभ्यासक्रम

 • प्रात्यक्षिक परीक्षा - १५ ते २५ सप्टेंबर
 • बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा - २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर
 • अंतिम वर्षातील नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा - ५ ते १५ ऑक्टोबर
 • निकाल - ३१ ऑक्टोबर

शॉर्ट टर्म कोर्सेस

 • प्रात्यक्षिक परीक्षा -१५ ते २५ सप्टेंबर
 • बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा - २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर
 • निकाल - ३१ ऑक्टोबर

अधिक माहितीसाठी - जिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या
 

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय

 • प्रात्यक्षिक परीक्षा - २१ ते २८ सप्टेंबर
 • अंतिम वर्षातील बॅकलॉगच्या परीक्षा - १ ते ९ ऑक्टोबर
 • अंतिम वर्षातील नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा - १० ते २४ ऑक्टोबर
 • निकाल - ३० ऑक्टोबर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who decided to take the final year exams after university