महापौरांच्या घरासमाेर बडवले ढाेल; ‘भारिप’चे करवाढीविराेधात आंदाेलन

याेगेश फरपट
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

भारिप बहुजन महासंघाने करवाढीला तीव्र विराेध केला आहे.

अकाेला : महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने शुक्रवारी (ता. १८) महापाैर विजय अग्रवाल यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरासमाेर ढाेल बदडून करवाढीची जाणिव करून देण्याचे आंदाेलन केले. मात्र निवेदन घेण्यासाठी सुद्धा महापौर हजर न राहिल्याने भारिप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत मागण्यावर विचार न झाल्यास तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील काेणत्याही महापालिकेने केली नाही एवढ्या माेठ्या प्रमाणात करवाढ अकाेला महापालीकेने केली आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड प्रमाणात राेष आहे. भारिप बहुजन महासंघाने करवाढीला तीव्र विराेध केला आहे. एवढेच नाहीतर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः करवाढीविराेधात महापालिकेवर माेर्चा काढून करवाढ कमी करण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली हाेती. आंदाेलन झाल्यानंतर तरी करवाढ कमी करण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करेल असे वाटले हाेते. मात्र महापालिका प्रशासनाने करवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १८ आॅगस्टराेजी भारिप बहुजन महासंघाच्या नगरसेवकांनी

महापाैर विजय अग्रवाल, उपमहापाैर वैशालीताई शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, करवाढ ठरावाचे सूचक ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी आणि अनुमोदक संजय बडोणे यांच्या घराला घेराव घातला. त्याठिकाणी ढाेल वाजवून करवाढ कमी करण्याबाबत सुचीत केले. या आंदाेलनात नगरसेविका अॅड. धनश्री देव-अभ्यंकर, जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, सम्राट सुरवाडे, प्रतिभा अवचार, राजू मिया देशमुख, मनपा गटनेते गजानन गवई, अनुराधा दौड, संताेष माेहड, अमाेल सिरसाट, मनाेहर शेळके, प्रदिप अवचार, नितेश दाभाडे, गाेविंदा पाताेडे आदींनी सहभाग घेतला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: akola news rpi prakash ambedkar protests tax