चंद्रपूर: अर्धवट कामाविरुद्ध चिमूरमध्ये नगरसेवकाचे उपोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

चिमूर (जि. चंद्रपूर) : कंत्राटदाराने कामे अर्धवट करून ठेवल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाला आणि कंत्राटदाराला वेळोवेळी कळवूनही दखल न घेतल्याने नगरसेवक उमेश हिंगे नगर परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत.

चिमूर (जि. चंद्रपूर) : कंत्राटदाराने कामे अर्धवट करून ठेवल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाला आणि कंत्राटदाराला वेळोवेळी कळवूनही दखल न घेतल्याने नगरसेवक उमेश हिंगे नगर परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत.

चिमूर नगर परीषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 9 मधील विकास कामे कंत्राटदार यांनी अर्धवट ठेवली आहेत. तसेच इतर प्रभागात सुद्धा कामे पूर्ण न करता अर्धवट ठेवण्यात आल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र त्याची कोणतीही दखल न घेतली गेली नाही. अखेर 21 जूनला मागण्याविषयी निवेदन देऊन यावर कार्यवाही न झाल्यास 29 जूनपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र या इशाऱ्यानंतरही कारवाई न केल्याने हिंगे आजपासून उपोषणाला बसले आहेत.

अर्धवट झालेली व कंत्राटदाराला नव्याने देण्यात आलेली कामे काढून घेण्यात यावीत, अशी मागणी हिंगे यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हिंगे यांनी उपोषणाला प्रारंभ केला. हिंगे यांच्या उपोषणाला विरोधी गटनेते नगरसेवक अब्दुल कदीर शेख, नगरसेवक विनोद ढाकुंनकर, नगरसेवक ऍड. अरुण दुधनकर, नगरसेवक गोपाल झाडे, नगरसेविका सीमा बुटके, नगरसेविका कल्पना इंदूरकर यांनी पाठींबा दिला आहे. "नगर परिषदेचा मनमानी कारभार सुरू असून एकाच कंत्राटदाराची मक्तेदारी आहे. सबंधित लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्यानेच अशी हुकूमशाही सुरू असून अंदाज पत्रकानुसार कामे न करता निकृष्ठ दर्जाची कामे करण्यात येत आहेत', अशा प्रतिक्रिया ढाकुंनकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
मोदी पाकला गेले तेव्हाच लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​
राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrapur news marathi news sakal news fast agiation