ताडोबा बफर क्षेत्रात धामण सापांचे रंगले प्रणय

जितेंद्र सहारे
रविवार, 25 जून 2017

हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने देशी विदेशी पर्यटकांचा इकडे ओढा वाढला आहे. मात्र इतर जैवविविधतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. विविध जातीचे दुर्मीळ वृक्ष, किटक, फुलपाखरे, पक्षी, लहान मोठे प्राणी तसेच सापांच्या वेगवेगळ्या जाती निवास करतात.

चिमूर - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याघ्र प्रकल्पात विख्यात असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जैव विविधतेने नटलेले आहे .पावसाळ्यास सुरवात झाल्याने विविध जातींचे साप बिळातून बाहेर आले आहेत .पडसगाव वन परीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पिपर्डा बिटात कक्ष क्रमांक ५६१ मध्ये सकाळची नियमीत रपेट मारत असताना धामण जातीच्या सापाच्या युगलाचे प्रणय रंगले असल्याचे दिसले.

हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने देशी विदेशी पर्यटकांचा इकडे ओढा वाढला आहे. मात्र इतर जैवविविधतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. विविध जातीचे दुर्मीळ वृक्ष, किटक, फुलपाखरे, पक्षी, लहान मोठे प्राणी तसेच सापांच्या वेगवेगळ्या जाती निवास करतात. मोर आणि सापांचे पावसाळ्यात सर्वाधिक वावर असतो. मात्र जंगल क्षेत्रात माणसाचे हस्तक्षेप व अतिक्रमण वाढल्याने या प्राण्यांना नैसर्गिक जगण्यात काहीसे अडथळे येतात. याचे प्रत्यय प्रणयात मग्ण असलेल्या धामण युगलांना पाहण्या करीता गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. सापांचे दुर्मिळ असणारे व क्वचीत नजरेत पडणारे प्रणय पाहण्याची उत्सुकता यामुळे वाढलेल्या गोंगाटाने अखेर एक तासभर चाललेल्या प्रणयास विराम देऊन साप निघून गेले.

नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याकरीता तसेच सापांना संरक्षण मिळावे आणि सापांना खाजगी जिवन मुक्तपणे उपभोगता यावे, करीता पळसगाव वन परीक्षेत्र अधिकारी एस. व्ही. मुरकुटे, सहकारी वन संरक्षक उद्धव लोखंळे, वनक्षक सातपुते व साळवे यांनी नागरीकांना समजविण्याचे प्रयत्न केले. मात्र नागरीक पाहण्यात दंग होते. या प्रणयाचे चित्रीकरण वन संरक्षक उद्धव लोखंळे यांनी करूण सकाळ माध्यम समुहास उपलब्ध करून दिले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प
मावळ तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार
पुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​
आंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​
संजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​
प्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​
सारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​

Web Title: Chandrapur news snake romancing in chimur