esakal | सभापतींवरील अविश्वास ठरावाचा पौर्णिमेला फैसला
sakal

बोलून बातमी शोधा

No-confidence motion on APMC chairmen

जिल्हाधिकऱ्यांकडून विशेष सभा घेण्यात आली असून सहकार आणि परिवर्तन पॅनल मधील सत्ता संघर्ष सामोरे आला आहे. बाजार समितीमध्ये सत्ता परिवर्तन हॊईल काय असे चित्र असून अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी 12 डिसेंबर रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे

सभापतींवरील अविश्वास ठरावाचा पौर्णिमेला फैसला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि.बुलडाणा) : येथील  बाजार समिती मधील परिवर्तन पॅनल अल्पमतात आले असून  सभापती गोविंदराव मिरगे यांच्यावर नुकताच जिल्हाधिकारी यांचेकडे सहकार पॅनल कडून अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे  बाजार समितीमध्ये सत्ता परिवर्तन हॊईल काय असे चित्र असून अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी 12 डिसेंबर रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे

शेगाव बाजार समितीवर गेली अनेक वर्ष पांडुरंगदादा पाटील यांचे वर्चस्व राहिले. मध्यंतरीच्या काळात सत्ता समीकरणे बदलून ही बाजार समिती भारतीय जनता पक्ष प्रणित परिवर्तन पॅनलकडे गेली.  बाजार समितीच्या निवडणूकित परिवर्तनचे 10 तर सहकार पॅनलचे 8 संचालक निवडून आले. विद्यमान सभापती गोविंद मिरगे यांची परिवर्तन पॅनलच्या संचालकांच्या पाठींब्याने सभापती पदावर निवड झाली होती. त्यानंतर काही महिन्यांनी उपसभापती  सुनिल वानखडे  यांनी सहकार पॅनलमध्ये जाहीर प्रवेश  घेतल्याने  परिवर्तन पॅनल व सहकार पॅनलचे 9 असे समान संचालक झाले होते. मात्र आता परिवर्तन पॅनलच्या संचालिका सौ.रूपाली अनंता बरडे यांचे संचालकपद खारीज झाल्याने परिवर्तन पॅनलचे 8 व सहकार पॅनलचे 9 संचालक झाले आहेत. आता विद्यमान सभापती गोविंद मिरगे यांचे पद अल्पमतात आले आहे. यामुळे आता सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांच्या गटातील संचालक यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा तसेच सचिव बाजार समिती शेगाव यांचेकडे सभापती मिरगे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करत विशेष सभा घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अविश्वास ठरावा वर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शेगावचे सहाय्यक निबंधक यांचे अध्यक्षतेखाली बाजार समिती मध्ये विशेष सभा आयोजित केली आहे. या सभेत आता नेमका काय निर्णय होतो हे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - हैद्राबाद घटनेची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचार करून हत्या

सभेत काय होणार?
सभापतीपवार अविश्वास पारित होण्यासाठी 12 मते विरोधात असावी लागतात. तर एक सदस्य अपात्र झाल्याने 11 मते लागतील. आता परिवर्तन पॅनल 8 आणि सहकार पॅनलची 9 मते आहेत. मात्र अविश्वास ठरावावर निर्णय हा जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात असून त्यांनी सभेला अध्यक्ष म्हणून प्राधिकृत अधिकारी नेमला आहे, ते याबाबत काय निर्णय घेतात यावर अविश्वास ठराव संमत होतो का? हे पहावे लागेल.

आनंद वार्ता - भूजल पातळी वाढली रे भाऊ!

सहीचे अधिकार काढण्याची मागणी
सभापती गोविंदराव मिरगे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना पदावर ठेवू नये तसेच अल्पमतात असल्याने त्यांचा सहीचा अधिकार काढावा, अशी मागणी सहकार पॅनलच्या वतीने करण्यात आलेली  आहे. सहाय्यक निबंधक यांच्या आदेशाने याबाबतीतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती बाजार समिती सचिव विलास पुंडकर यांनी दिली आहे.

महत्त्वाची बातमी - सावधान... विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक कराल तर खबरदार

राजकीय आकसबुद्धीने आरोप
माझ्यावर केलेले आरोप हे राजकीय आकसबुद्धीने करण्यात आले आहेत. माझ्या विरोधात दाखल अविश्वास ठराव पारित होण्यासाठी नियमानुसार 11 मते हवी आहेत. त्यामुळे हा ठराव पारित होणार नसून शेगाव बाजार समितीमध्ये परिवर्तन पॅनेलची सत्ता कायम राहील.
- गोविंदराव मिरगे, सभापती बाजार समिती शेगाव

अवश्य वाचा - विदेशी पाहूणा बार हेडेड गुजचे अकोला जिल्ह्यात दर्शन

बाजार समितीच्या निधीचा दुरुपयोग
सभापतींनी अधिकाराचा गैरवापर करून बाजार समितीच्या निधीचा दुरुपयोग केल्याने नियम व तरतुदीनुसार अपात्र घोषित करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. जिल्हाधिकारी त्यांना अपात्र ठेवतील आणि  त्याआधारे आम्ही दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर होईल. सभापती सध्या अल्पमतात आहेत.
-श्रीधर उन्हाळे, टाकळी विरो ता.शेगाव

loading image