काळ्या आईशी इमान राखणार: उद्धव ठाकरे

अनिल दंदी
गुरुवार, 15 जून 2017

बाळापूर तालूका शिवसेनेच्या वतीने ढोलताशे व फटाके वाजवून उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. आज गुरुवारी सकाळपासूनच ठाकरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी उपस्थित होते. अल्पभूधारक व मध्यम शेतकर्‍यांची कर्जमाफी झाल्याने उध्दवजींचे आभार मानले.

अकोला - काळ्या आईशी ईमान राखणार असून, शेतकर्‍यांना संपुर्ण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) बाळापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना दिले.

राष्ट्रीय महामार्गावरील मराठा हाॅटेलवर पंधरा मिनिटे त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. शिवणी विमानतळावरून शेगांवकडे प्रस्थान करताना उद्धव ठाकरे यांचा ताफा शेतकर्‍यांनी थांबविला. यावेळी बाळापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 च्या चौपदरीकरणाच्या भुसंपादनातील मोबदल्याबाबत शेतकर्‍यांवर झालेला अन्यायाचा पाढा शेतकर्‍यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुढे वाचला. अन्यायग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. कापूस व मातीची भेट देऊन उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.

बाळापूर तालूका शिवसेनेच्या वतीने ढोलताशे व फटाके वाजवून उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. आज गुरुवारी सकाळपासूनच ठाकरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी उपस्थित होते. अल्पभूधारक व मध्यम शेतकर्‍यांची कर्जमाफी झाल्याने उध्दवजींचे आभार मानले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, दिवाकर रावते होते. यावेळी जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, बाळापूर तालूका प्रमुख संजय शेळके, मराठा हाॅटेलचे मुरलीधर राऊत, आकाश दांदळे, मनोहर बचाटे, रमेश मांगटे, जगदिश हागे, रणजीत अहिर, शे.अब्रान, आशाताई फुरंगे, गोपाल झुनझुनवाला यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मध्यावधी निवडणुकीसाठी भाजप तयार: मुख्यमंत्री फडणवीस
रामदेव बाबांविरोधात अजामीनपात्र वॉरंट
कर्जमाफीचे श्रेय नक्की कोणाचे?​
नक्षत्रांचं देणं... ​
युद्धाचे आदेश देणाऱ्यांना लढायला पाठवावे: सलमान खान​
जनलोकपाल व "लोकायुक्त'साठी पुन्हा जंतरमंतर गाठणार - अण्णा हजारे​

Web Title: Vidarbha news Uddhav Thackeray meet farmers in Akola