Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video) 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 September 2019

गाडी चालवताना झोप लागली तर ऑटो पायलट तंत्रज्ञान काम करतं. झोपलेल्या ड्रायव्हरला जागं करण्यासाठी हे तंत्रज्ञान जोरजोरात बीप बीप असं आवाज करतं. हा आवाज ऐकूनही जर ड्रायव्हर जागा झाला नाही तर मग आटोमॅटिक गाडीचा वेग कमी केला जातो. 

गाडी चालवताना डोळा लागून अनेक अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण, आता काळजी करायला नको...चक्क गाडी चालवताना झोप आल्यास हे तंत्रज्ञान उपयोगी ठरणार आहे. टेलसानं त्यांच्या कारमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलंय. ऑटो पायलट या तंत्रज्ञानामुळं अशा अपघातांना आळा घालण्यास मदत होईल.

गाडी चालवताना झोप लागली तर ऑटो पायलट तंत्रज्ञान काम करतं. झोपलेल्या ड्रायव्हरला जागं करण्यासाठी हे तंत्रज्ञान जोरजोरात बीप बीप असं आवाज करतं. हा आवाज ऐकूनही जर ड्रायव्हर जागा झाला नाही तर मग आटोमॅटिक गाडीचा वेग कमी केला जातो. 

या व्हिडीओत पाहा...बीप बीप आवाज होत असतानाच गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवलं जाते. अशा प्रकारे हे तंत्रज्ञान काम करणार आहे. हे यंत्र आता काही गाड्यांमध्ये लावण्यात आल आहे. असं तंत्रज्ञान सगळ्याच गाड्यांमध्ये लावलं तर यामुळं अपघातांमध्ये घट होऊ शकते. त्यामुळं लवकरच हे तंत्रज्ञान मार्केटमध्ये उपलब्ध होणार असून, याचा सगळ्यांनाच फायदा होईल.

संबंधित बातम्या :
Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)
Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)
Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)
Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya buzzer siren if driver sleep on driving a car