esakal | Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan-x-ray-machine

एअरपोर्टवर सामानाची तपासणी करण्यासाठी एक्स रे स्कॅनर मशीन ठेवलेली असते. पण, या मशीनमधून चक्क माणसंच बाहेर आली. जिथं सामानाची तपासणी केली जाते तिथूनच माणसं बाहेर येत असल्यानं सुरक्षा रक्षकांनी सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एअरपोर्टवर सामानाची तपासणी करण्यासाठी एक्स रे स्कॅनर मशीन ठेवलेली असते. पण, या मशीनमधून चक्क माणसंच बाहेर आली. जिथं सामानाची तपासणी केली जाते तिथूनच माणसं बाहेर येत असल्यानं सुरक्षा रक्षकांनी सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, कुणीही ऐकत नव्हतं. एका मागोमाग एक असे सगळेजण एक्सरे मशीनमधून बाहेर पडत होते. आता बघा या मशीनने बॅगा चेक केल्या जातात. पण, हे सगळेजण या मशीनमधून बाहेर पडतायत. हा सगळा प्रकार पाकिस्तानच्या पेशावर एअरपोर्टवर पाहायला मिळाला. 

हा सगळा प्रकार नक्की का घडला याची आम्ही सत्यता जाणून घेतली...त्यावेळी आम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसला...मोठ्या संख्येनं पाकिस्तानातून लोक हज यात्रेला गेले होते...हज यात्रेवरून परत निघताना मक्का मदीनावरून आणलेलं पवित्र पाण्याचं कॅन प्रत्येकाकडं होतं...हे पाणी पवित्र मानलं जातं असल्यानं प्रत्येकजण कॅन जीवापाड जपत होता.

एअरपोर्टवरही गर्दी असल्याने कन्वेर बेल्टकडेही मोठी रांग लागली होती...पाण्यानं भरलेलं कॅन जर त्या मशीनमध्ये ठेवलं आणि कुणीतरी आपलं कॅन नेलं तर याचीही भीती त्यांच्या मनात होती...त्यामुळं सुरक्षा रक्षक पकडतील याचा विचार न करता सगळेजण पाण्याच्या कॅनसह एक्सरे मशीनवर बसले...आणि सगळेजण एअरपोर्टवरून बाहेर पडले.

हा सगळा प्रकार पाहून तिथल्या सुरक्षा रक्षकांनी सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला...मात्र, कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं...लोकही मोठ्या संख्येनं असल्यानं सुरक्षा रक्षकही हैराण झाले...पण, जिथे बॅगा तपासण्यासाठी मशीन लावली त्याच मशीनमधून हे पाकिस्तानी लोक आल्यानं यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

***************************************************************
आणखी वाचा  :

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************

loading image
go to top