Viral Satya : शेतकऱ्यानं बनवली मिनी ट्रेन ! (Video)

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 November 2019

कोल्हापुरातील चिमणे गावचे प्रगतीशील शेतकरी उदय नादवाडेकर यांनी ही ट्रेन बनवलीय. टाकाऊ वस्तूंपासून ही ट्रेन बनवल्यानं शेतीच्या कामात ट्रेनचा खूप उपयोग होतोय. 300 मीटरचं अंतर पार करण्यासाठी या ट्रेनला फक्त 1 मिनीट 40 सेकंद लागतात.

गवताचा भारा नेत असलेली ही आहे मिनी ट्रेन. शेतकऱ्यानं ही स्वत:च घरी मिनी ट्रेन तयार केलीय. हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण, कोल्हापुरातील चिमणे गावचे प्रगतीशील शेतकरी उदय नादवाडेकर यांनी ही ट्रेन बनवलीय. टाकाऊ वस्तूंपासून ही ट्रेन बनवल्यानं शेतीच्या कामात ट्रेनचा खूप उपयोग होतोय. 300 मीटरचं अंतर पार करण्यासाठी या ट्रेनला फक्त 1 मिनीट 40 सेकंद लागतात.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

उदय यांची गावाबाहेरील शेती आहे. याठिकाणी त्यांनी 25 जनावरांचा मुक्त गोठा तयार केलाय. जनावरांच्या ओल्या चा-यासाठी 3 एकर क्षेत्रात संकरीत गवताची लागवड केली. गोठ्यात 17 गायी, 4 म्हशी आहेत. या सर्वांना 50 किलो ओले गवत दिवसाला लागतं. एवढं गवत कापून आणण्यासाठी 4 माणसं लागायची. गोठा उंचावर आणि गवताची शेती 50 फूट खाली असल्यानं गवत डोक्यावरून आणताना दमछाक व्हायची. बैलगाडीही जावू शकत नव्हती. त्यामुळं पायी चालत गवत आणण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून उदय यांनी गवत आणण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून मिनी ट्रेन तयार केली.

कशी बनवली मिनी ट्रेन ? 
- जुन्या बाजारातून विहिरीचा गाळ काढणारे डिझेल इंजिन खरेदी केले
- तीनशे मीटर लोखंडी पाईप टाकून लोखंडी ट्रॉली तयार केली
- लोखंडी रोपाच्या सहाय्याने इंजिनला जोडून त्याची चाचणी घेतली
- 4 लाखांची ट्रेन 40 हजार रुपयांत बनवली

अशा प्रकारे उदय नादवाडेकर यांनी ही ट्रेन बनवली. या ट्रेनचा उपयोग रोज शेतीच्या कामासाठी होतो. कमी पैशांत आणि कमी मेहनतीत हे काम होतंय. यामुळं उदय नादवाडेकर यांचा मिनी ट्रेनचा प्रयोग कौतुकास्पद आहे.

**************************************************************

Viral Satya : मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करा जपून (Video)

Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video)

Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video)

Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video)

Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video)

Viral Satya : नारळ उतरवण्याची माकडाला ट्रेनिंग (Video)

Viral Satya : एलआयसीमधले पैसे बुडणार? (Video)

Viral Satya : पुण्यात रात्रीच्या अंधारात मुलीला भुतानं झपाटलं? (Video) 

Viral Satya : डोक्यावर पाय ठेवून भक्तांना आशीर्वाद (Video)

Viral Satya : खांद्यावर बसलं माकड, पोलिसाच्या डोक्याला मसाज (Video)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya Video Farmer made mini train