
नाग आणि मुंगूसाचं वैर हे सगळ्यांनाच माहित आहे. अशातच नाग आणि मुंगूस समोरासमोर आले आणि सुरू झाला मृत्यूचा थरार. आता या व्हिडीओत पाहा. चिखलामध्ये मुंगूस आणि नाग एकमेकांसमोर आले. आधीच दोघांमध्ये विळ्या भोपळ्याचं वैर आणि त्यात दोघे एकत्र आल्यावर दोघांमध्ये लढाई सुरू झाली. बघा, हे मुंगूस नागावर हल्ला करतंय.
नागही या मुंगुसाच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करतोय. विषारी नाग मुंगुसावर हल्ला करत होता. तरीदेखील मुंगुस या नागाला मारण्याचं प्रयत्न करतंय.
मुंगूसाने हल्ला केल्यानंतर नागाने त्याला एकदा झटका दिला. परंतु यात नाग यशस्वी होऊ शकला नाही. नाग पळण्याच्या प्रयत्नात होता. पण, आक्रमक झालेलं मुंगूस नागावर हल्ला करतच होतं. आता बघा, कसं हे मुंगूस नागावर हल्ला करतंय...नाग या मुंगूसाच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वारंवार हल्ला करून नागाला जखमी केलं आणि रस्त्यावरून नागाला जंगलात ओढत नेलं. जवळपास चार मिनिटं यांची लढाई सुरू होती.
हा सगळा प्रकार औरंगाबादमधील हरसूल गावात पाहायला मिळालाय. वीटभट्टी परिसरात एका तलावाजवळ मुंगूस आणि नागामध्ये हे युद्ध सुरू होतं. चार मिनिटं सुरू असलेल्या या लढाईत मुंगूसाने नागाला ठार केलं. पण, व्हिडीओ बनविण्यापेक्षा मुंगूसाला पळवून लावलं असतं तर आज नाग जिवंत राहिला असता. मात्र, मुंगूसाला पळवण्याचा कुणीही प्रयत्नदेखील केला नाही. त्यामुळं या नागाला जीव गमवावा लागलाय.
*****************************
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.