बोअरवेलमधून 2 वर्षांच्या मुलाला काढले सुखरुप बाहेर

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

गुंटूर जिल्ह्यातील विनूकोंडा येथे दोन वर्षांचा मुलगा खेळताना बोअरवेलमध्ये पडला. चंद्रशेखर असे या मुलाचे नाव असून, त्याच्या बचावासाठी एनडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासन यांनी 11 तास बचाव मोहिम राबवत त्याला सुखरुप बाहेर काढले.

गुंटूर : आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या 2 वर्षांच्या मुलाला 11 तास बचावमोहिम राबवून सुखरुप बाहेर काढले.

गुंटूर जिल्ह्यातील विनूकोंडा येथे दोन वर्षांचा मुलगा खेळताना बोअरवेलमध्ये पडला. चंद्रशेखर असे या मुलाचे नाव असून, त्याच्या बचावासाठी एनडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासन यांनी 11 तास बचाव मोहिम राबवत त्याला सुखरुप बाहेर काढले. चंद्रशेखरला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळत असताना हा मुलगा 15 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला वाचविण्यासाठी समांतर खड्डा खोदण्यात आला. एनडीआरएफच्या पथकाने युद्धपातळीवर बचावकार्य राबवत या मुलाचा जीव वाचविला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री एन. चीन राजप्पा यांनी मुलाच्या बचावासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले होते. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: 2-Year-Old Boy Who Fell Into Borewell Rescued After 11 Hours