आत्मसमर्पण केले तर पाकिस्तान माझं कुटुंब संपवेल: दहशतवादी दुजाना

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

भारतीय लष्कराकडून त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यानंतर पाकिस्तानचा चेहरा उघड झाला आहे. अबु दुजाना स्पष्टपणे बोलताना दिसता आहे, की पाकिस्तान खेळ खेळत असून, काश्मीरमध्ये जे काही चालले आहे ते जिहाद नाही. मी तुमच्यासमोर आत्मसमर्पण केले तर पाकिस्तान माझ्या कुटुंबाला संपवून टाकेल.

श्रीनगर - भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केले तर पाकिस्तान माझ्या कुटुंबाला संपवेल हे शब्द आहेत भारतीय लष्कराच्या कारवाईत ठार झालेला लष्करे तैयबाचा कमांडर अबू दुजाना याचे. अबू दुजानाला ठार करण्यापूर्वी त्याने केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे.

मंगळवारी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत अबु दुजानासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. एका घरात हे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली होती. भारतीय लष्कराकडून त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यानंतर पाकिस्तानचा चेहरा उघड झाला आहे. अबु दुजाना स्पष्टपणे बोलताना दिसता आहे, की पाकिस्तान खेळ खेळत असून, काश्मीरमध्ये जे काही चालले आहे ते जिहाद नाही. मी तुमच्यासमोर आत्मसमर्पण केले तर पाकिस्तान माझ्या कुटुंबाला संपवून टाकेल.

सुरक्षा अधिकारी आणि दुजानामध्ये झालेले संभाषण:

  • अधिकारी - दुजाना आत्मसमर्पण कर
  • दुजाना - अखेर तुम्ही मला शोधून काढलेच. अभिनंदन तुमचे, पण मी आत्मसमर्पण करणार नाही. मला माहिती आहे, हे काही नाही फक्त ए टू झेड आयवॉश आहे.
  • अधिकारी - तुला पाकिस्तानी यंत्रणा खेळण बनवत आहे
  • दुजाना - हो, मला माहिती आहे पाकिस्तान हा खेळ खेळत आहे. मात्र, माझे कुटुंब पाकिस्तानमध्ये आहे. त्यांच्या सर्वांच्या जिवाला धोका आहे. मी आत्मसमर्पण केले तर ते माझ्या कुटुंबाला संपवून टाकतील. मला माहिती आहे, की हा जिहाद नाही.
  • अधिकारी - आम्ही तुला संधी देतो, तो आत्मसमर्पण कर. त्यामुळे काश्मीरमधील नागरिकांना कळेल की हे सर्व पाकिस्तान करत आहे.
  • दुजाना - नाही, आता आत्मसमर्पण करता येणार नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :