तरुणीचा पाठलाग करणाऱ्या भाजप प्रमुखाच्या मुलाला अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

गाडीचा पाठलाग केल्याची तक्रार सदर मुलीने पोलिसांकडे केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

चंडीगड : तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी हरियाना भाजपचे प्रमुख सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला व त्याच्या अन्य एका साथीदारास पोलिसांनी आज अटक केली.

विकास व त्याचा मित्र आशिष कुमार यांनी काल (ता. 4) रात्रीच्या सुमारास आपल्या गाडीचा पाठलाग केल्याची तक्रार सदर मुलीने पोलिसांकडे केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पीडित तरुणीचे वडील आएएस अधिकारी असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा?
पाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागरिकांचे हाल
क्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी
औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस
खडसेंबाबतचा फैसला मुख्यमंत्र्यांच्या हाती
देश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे
महेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण