सिंधुदुर्गात पावसाचा कहर; पूरजन्य स्थिती

शिवप्रसाद देसाई
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सावंतवाडीः सिंधुदुर्गात पावसाने कहर केला आहे. सोमवारी (ता.18) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागामध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली. कापणीला आलेले भातपीक या पावसामुळे संकटात सापडले आहे.

सावंतवाडीः सिंधुदुर्गात पावसाने कहर केला आहे. सोमवारी (ता.18) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागामध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली. कापणीला आलेले भातपीक या पावसामुळे संकटात सापडले आहे.

जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. याचा जोर आतापर्यंत कायम आहे. समुद्रही खवळला आहे. वादळसदृष्य स्थितीमुळे समुद्रात जावू नये, असे आवाहन प्रशासनाने मच्छीमारांना केले आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पूरजन्य स्थिती आहे. देवबागमध्ये कर्ली खाडीच्या उधाणाचे पाणी घुसले. मालवण शहरात अनेक भागात पाणी साचले. बागायत येथे पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. मसूरेमध्येही पाणी साचल्याने अनेक भागात वाहतूक ठप्प झाली आहे. आंबेली पुलावर पाणी आल्याने माणगाव खोर्‍याचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडले. मुसळधार पावसामुळे भितीचे वातावरण आहे.

मसूरेत दरड
मसूरे-तळाणीवाडी येथे पावसामुळे दरड कोसळल्याचा प्रकार घडला. यामुळे तेथील काही घरांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास तीव्रता वाढण्याची भिती आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

शेती धोक्यात
जिल्ह्यात बहुसंख्य भातशेती कापणीच्या जवळपास पोहोचली आहे. या पावसामुळे भातखाचरामध्ये पाणी घुसले व साचले आहे. यामुळे भात कुजण्याची भिती आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :