#स्पर्धापरीक्षा - नदी जोड प्रकल्प

संतोष शिंत्रे 
गुरुवार, 29 जून 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.  स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  http://sakalpublications.com वर तसेच Amazon वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

भारत सरकार विविध नदी जोड प्रकल्पांवर 5,60,000 कोटी रु. खर्च करणार आहे. हा खर्च पुढीलप्रमाणे :

  • सपाटीवरून वाहणाऱ्या 16 नद्यांकरिता : 1,85,000 कोटी रु. 
  • हिमालयातील 14 नद्यांकरिता : 3,75,000 कोटी रु. 
  • आंतरराज्य वाद मात्र या प्रकल्पांकरिता अडथळे ठरू शकतात. 
  • राज्यांतर्गत नदी जोड प्रकल्प अधिक व्यवहार्य आहेत. 
  • नियोजनात अत्यंत प्रगतिपथावर असलेल्या नदी जोड प्रकल्पात पाणीसाठा आणि कालवे यांच्यात सांधेजोड करणे, केन आणि बेतवा या उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील नद्या जोडणे तसेच दमणगंगा आणि पिंजाल या गुजरात आणि महाराष्ट्रातील नद्या जोडणे याचा समावेश आहे. 
  • केन-बेतवा नदी जोड प्रकल्पामुळे दुष्काळ प्रवण बुंदेलखंड विभागाला फायदा होणार असून या विभागातील 3.5 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

प्रकल्पाचे बाधक परिणाम 
दौधन धरणाची उंची :

पर्यावरणवाद्यांच्या मते केन आणि बेतवा या उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील नदीजोड प्रकल्पाशी निगडित प्रस्तावित दौधन धरणामुळे मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र अभयारण्यातील किमान 4000 हेक्‍टर क्षेत्र बुडिताखाली जाणार आहे. 

या अभयारण्यातील सर्व वाघ शिकारीमुळे 2009 मध्ये नाहीसे झाले होते आणि अलीकडेच त्याची अंशतः भरपाई झाली आहे. 

अभ्यासकांच्या मते या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांना प्रत्यक्षात आश्‍वासित पाणी मिळणार नाही. तसेच या विभागात गिधाडांची वस्ती असून, प्रस्तावित दौधन धरणाच्या उंचीमुळे गिधाडांच्या घरट्यांना धोका निर्माण होईल. 
अभयाण्यातील जेवढी जागा पाण्याखाली जाईल त्याच्या दुप्पट जागा भरपाई म्हणून मध्य प्रदेश सरकारने आधीच मान्य केली आहे. 

जंगल जमीन साफ करणे, नामशेष होऊ घातलेल्या प्रजातींना निर्माण होणारा धोका, तसेच काही शेतकऱ्यांचे पुनर्स्थापन या महत्त्वाच्या विषयांकरिता पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून परवानगीची आवश्‍यकता आहे. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-

#स्पर्धापरीक्षा - डोनाल्ड ट्रम्प

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्प

#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण

#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली

#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण

#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'

#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना

#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'

#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना