हैद्राबाद बॅंकेने नाकारला शेतकऱ्यांना अग्रीम

याेगेश फरपट
मंगळवार, 20 जून 2017

बॅंकेचा अधिकारी पैसै देत नाही म्हणून आम्ही पालकमंत्र्यांकडे तक्रारीसाठी गेलाे. मात्र पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील भेटू शकले नाही. स्वीय सहाय्यकाकडे तक्रार करीत न्याय मिळवून देण्याची मागणी अाम्ही केली आहे.
- दिगंबर अमृतराव वानखडे, शेतकरी बाेरगाव मंजू

अकाेला - काेणताही जीआर प्राप्त झाला नसून जाेपर्यंत आदेश येत नाहीत. ताेपर्यंत आम्ही अग्रीम देवू शकणार नाही असा दम हैद्राबाद शाखेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्यांना दिला. एकीकडे जिल्हा मध्यवर्ती बॅंक अग्रीम देते तर दुसरीकडे त्याच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंक शेतकऱ्यांना अशाप्रकारे टरकावून लावते हा प्रकार गंभीर अाहे. 

कर्जमाफीला विलंब असल्याने सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून निकष पुर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा हजार रूपये अग्रीम देण्याची घाेषणा तीन दिवसापूर्वी केली. मात्र अद्याप अकाेला जिल्हा मध्यवर्ती बॅंक वगळता एकाही राष्ट्रीयकृत बॅंकेने शेतकऱ्यांना अग्रीम देण्यासाठी पुढाकार घेतला नाही. बॅंक अधिकारी म्हणतात, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मानत नाही, आम्हाला लेखी आदेश पाहीजे. अकाेला तालुक्यातील बाेरगाव खुर्द, पातूर नंदापूर, काेळंबी येथील काही शेतकरी अकाेल्यातील हैद्राबाद बॅंकेच्या शाखेत गेले. त्यापैकी अनेक शेतकरी निकष पुर्ण करणारे हाेते. मात्र जेव्हा शेतकऱ्यांनी बॅँक अधिकाऱ्याला अग्रीम पाहिजे असल्याची मागणी केली तेव्हा अधिकाऱ्याने हात वर केले. जाेपर्यंत आमच्याकडे हुंडी येत नाही, शिवाय लेखी आदेश प्राप्त हाेत नाही, ताेपर्यंत आम्ही अग्रीम देवू शकणार नाही. बॅंक अधिकाऱ्याचे असे बाेलणे एेकून शेतकऱ्यांनी ‘सकाळ’ हेल्पलाईनला संपर्क करीत आपले गाऱ्हाणे मांडले.  

बॅंकेचा अधिकारी पैसै देत नाही म्हणून आम्ही पालकमंत्र्यांकडे तक्रारीसाठी गेलाे. मात्र पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील भेटू शकले नाही. स्वीय सहाय्यकाकडे तक्रार करीत न्याय मिळवून देण्याची मागणी अाम्ही केली आहे.
- दिगंबर अमृतराव वानखडे, शेतकरी बाेरगाव मंजू

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
काय आहे 'मुख्यमंत्री फेलोशिप'? माहिती घ्या 'सकाळ'च्या व्हिडिओतून​
दलितांची कर्जे माफ करावीत : रामदास आठवले​
घोषणांच्या पावसात शेतकरी कोरडाच
पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय?
मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे
#स्पर्धापरीक्षा - GST​
दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले​
कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक​
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या​
गरोदर लेकीला मारणाऱ्या नराधम बापाला अखेर फाशी