औंढा नागनाथ दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

औंढा नागनाथ (हिंगोली): श्रावण महिन्या निम्मीत्त देशातील 12 ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री नागेश्वर आठवे ज्योर्तिलिंग नगरीत पहिल्या श्रावण सोमवारी 70 हजार भाविकांनी श्री नागेश्वर भगवानचे दर्शन घेतले.

औंढा नागनाथ (हिंगोली): श्रावण महिन्या निम्मीत्त देशातील 12 ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री नागेश्वर आठवे ज्योर्तिलिंग नगरीत पहिल्या श्रावण सोमवारी 70 हजार भाविकांनी श्री नागेश्वर भगवानचे दर्शन घेतले.

आज (सोमवार) रात्री 12 वाजता देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, विश्वस्त पुरुषोत्तम देव सपत्नीक, विश्वस्त आनंद निलावार यांनी श्रीची महापुजा व दुग्ध अभीषेक केला व ठिक 2.00 वा. भाविकांच्या दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आले. श्रींच्या दुग्धाभीषेकाचे आवर्तने पदमाक्ष पाठक, आबागुरु बल्लाळ, बंडु पंडीत, निळकंठ देव, श्रीपाद दिक्षीत ब्राम्हणांनी म्हणले. श्रींच्या दर्शनासाठी देशातील व पंचकोषीतील भाविक भक्त औंढा नगरीत हरहर महादेव, बम बम भोले, नागनाथ महाराज की जय, आदी घोषवाक्यांनी मंदीर परीसर दुमदुमला.

आज पहील्या श्रावण सोमवारी 70 हजार भाविकांनी शांततेत नागनाथाचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने भाविक भक्तांना फराळाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या वेळी दिवसभर मंदीरामध्ये दिंडयासह भाविक भक्त मोठया उत्साहाने दाखल झाले होते. श्रावण सोमवार निमित्त विश्वस्त गणेश देशमुख, रमेशचंद्र बगडीया, विलास खरात, ॲड. मुंजाभाउ मगर, गजानन वाखरकर, प्रा. देविदास कदम, सौ. विदयाताई पवार, शिवाजी देशपांडे हे विश्वस्त दिवसभर मंदीरात होते. उप पोलीस अधीक्षक सौ. सुजाता पाटील यांनीही मंदीर परीसराचा कडक पोलिस बंदोबस्ताकडे लक्ष देवून बंदोबस्ताबाबत पोलिस कर्मचाऱयांना सुचना दिल्या.

यावेळी निळकंठ देव, वैजनाथ पवार, शंकर काळे, बापुराव देशमुख, सुरक्षा रक्षक यांनाही परीश्रम घेतले. पोलिस अधिक्षक चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस अधिक्षक सचीन गुंजाळ, सिध्दनाथ भोरे, पोलिस निरीक्षक गणपत दराडे, उप पोलिस निरीक्षक मोहन ढेरे, उप पोलिस निरीक्षक साईनाथ अनमोड यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :