औरंगाबाद: 158 कुटुंबियांना प्रत्येकी पंधरा हजारांचे दिले धनादेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगारातून शेतकरी कुटुंबियांना मदत

औरंगाबाद: जिल्हा परिषदेचे अधिकरी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या एक दिवसाच्या वेतनातून औरंगाबाद जिल्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 158 वारसांना आज (सोमवार) प्रत्येकी पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मराठवाडा महसुल प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगांवकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.

मागील एक वर्षापासून मदत वितरित करण्याचे प्रकरण प्रलंबित होते. कोणत्या ना कोणत्या कारणांने शेतकरी कुटुंबियांना मदत करण्याच्या कार्यक्रमांचे नियोजन प्रशासनाला करता आले नाही. यामध्ये कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. आता एका वर्षानंतर जिल्हा परिषदेकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचा वारसांना अखेर मदतीचे धनादेश देण्यात आले आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :