बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस; अनेक ठिकाणी मुसळधार

दत्ता देशमुख
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

आष्टी, पाटोदा, अंबाजोगाईत अतिवृष्टी

बीड : मागील चार दिवस उघडीप दिलेल्या पावसाने  मध्यरात्रीनंतर जोरदार हजेरी लावली. आज (ता. ८) सकाळीही अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता. या पावसामुळे शहरांतील सखल भागात पाणी साचले.

गुरुवारी दिवसभर जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस झाला होता. रात्री माजलगाव शहर व तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर तर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला तो सकाळी ८ वाजेपर्यंतही सुरूच होता.
या जोरदार पावसामुळे शहरी भागातील सखल भागात पाणी साचले.

अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
दरम्यान, आष्टी, पाटोदा, अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी पात्रांतून पाणी वाहत आहे. बीड शहर व परिसरात जोरदार झाल्याने बाजूचे ओढे भरून वाहत आहेत. तसेच बिंदुसरा नदीपात्रातील पाणीही वाढले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’