कल्याणमध्ये नालेसफाई न झाल्याने साचले पाणी

रविंद्र खरात
गुरुवार, 29 जून 2017

कल्याण: पावसाळ्यापूर्वी दरवर्षी 31 मे पूर्वी पालिका प्रशासन छोटे मोठे गटार आणि नाले सफाई करते. मात्र, यावर्षी ही काम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाले यामुळे काही तासात पडलेल्या पावसात पालिकेच्या कामांचा पोलखोल झाला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी साठलेला कचरयामुळे अडथळा निर्माण झाला, यामुळे अनेक ठिकाणी नागरिकाचे नुकसान झाले. नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, याला जबाबदार पालिका अधिकारी वर्गावर कारवाई करत संबधित ठेकेदाराचे बिल अदा करु नये, अशी मागणी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड़ यांनी केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दित 27 गाव सहित 89 नाले आहेत. याचा खर्च अपेक्षित 3 कोटी 35 लाख रुपये असून, गटारसाठी सुमारे 2 कोटी 34 लाख रुपये खर्च आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई 80 टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनने केला आहे. 31 मे पूर्वी दरवर्षी पालिका हद्दीत नाले सफाई करते. मात्र, जून महिन्याच्या आठवड्यात कामाला सुरुवात झाल्याने ही काम अर्धवट राहिली. अनेक ठिकाणी नाल्याच्या कचरा रस्त्यावर आणि नाले शेजारी ठेकेदाराने टाकल्याने घाणीचे साम्रज्य निर्माण झालेच. शनिवार (ता. 24) पासुन सुरु झालेल्या काही तासाच्या पावसात कल्याण पूर्व मधील पूनालिंक रोड, हाजी मलंग रोडच्या आजू बाजुच्या परिसर आणि नाले शेजारील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरातील सामानाची नुकसान झाले. नुकसानीची भरपाई पालिकेने द्यावी, याला जबाबदार अधिकारी वर्गावर कारवाई करत संबधित ठेकेदाराचे बिल देऊ नये, अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

या घाणीच्या साम्राज्यमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आली असून, साथ रोग परिस्थिती निर्माण झाल्यास पालिका प्रशासन असल्याचे मत आमदार गायकवाड़ यांनी व्यक्त केले आहे. यामुळे पालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष्य लागले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी