पोरबंदर एक्स्प्रेसमधून वोडका 2000 बाटल्या जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

इंजिनपासून दुसऱ्या क्रमांकाच्या या एक्सप्रेसच्या जनरल डब्यातील शौचालयात 8 गोणी भरून हा साठा लपविण्यात आला होता.

कल्याण : गुजरातला जाणाऱ्या कोचीवली-पोरबंदर एक्स्प्रेसमधून छुपेपणाने आणलेल्या 2 हजार वोडका दारूच्या बाटल्यांचा साठा कल्याणच्या रेल्वे सुरक्षा बलाने सोमवारी हस्तगत केल्याने खळबळ उडाली असून, रेल्वे सुरक्षिततेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

कल्याणच्या रेल्वे सुरक्षा बलाला गोव्यावरून गुजरातला वोडका दारूच्या बाटल्यांचा साठा नेला जात असल्याची मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सदर एक्सप्रेसमध्ये कोच नंबर 15436 मध्ये शोध घेतला. इंजिनपासून दुसऱ्या क्रमांकाच्या या एक्सप्रेसच्या जनरल डब्यातील शौचालयात 8 गोणी भरून हा साठा लपविण्यात आला होता. 

सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीप ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल ते कोपर स्थानकांच्या दरम्यान सोमवारी ही कारवाई केली. या साठ्यावर दावा सांगण्यास एकही प्रवासी पुढे आला नसल्याने बेवारस स्थितीत सापडलेला हा साठा पथकाने ताब्यात घेतला आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :