मुंबई: जुहू चौपाटीवर सापडला डॉल्फिनचा मृतदेह

नेत्वा धुरी
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. रविवारी दादर चौपाटीवर व्हेल माशाचे पिल्लू आढळून आले होते. आज सकाळी जुहुतील मोरगाव किनाऱ्यावर डॉल्फिनचा मृतदेह स्थानिक मच्छिमारांना आढळून आला.

मुंबई : जुहू चौपाटी येथील मोरागाव येथे आज (बुधवार) सकाळी डॉल्फिनचा मृतदेह आढळून आला. किनारपट्टीच्या कचऱ्याच्या बाजूलाच डॉल्फिनचा मृतदेह स्थानिक मच्छिमारांना दिसून आला.

आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. रविवारी दादर चौपाटीवर व्हेल माशाचे पिल्लू आढळून आले होते. आज सकाळी जुहुतील मोरगाव किनाऱ्यावर डॉल्फिनचा मृतदेह स्थानिक मच्छिमारांना आढळून आला.

बोटीचे बांधकाम करून घरी परतणाऱ्या मच्छिमारांना सकाळी साडेडहाच्या सुमारास चार फूट लांबीचा डॉल्फिनचा मृतदेह सापडला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: