कोल्हापूरला विमानसेवा जेंव्हा सुरु होईल तेंव्हाच ते खरे: चंद्रकांत पाटील

डॅनिअल काळे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कोल्हापूर : कोल्हापूरला विमान सुरु व्हावे, यासाठी आता अंबाबाईलाच नवस करायला हवे. विमान सुरु करण्याचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. अनेकदा विमान सुरु होण्याच्या तारखा येतात, पण आता कोल्हापूरला विमान सुरु होईल. तेंव्हाच ते खरे होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली.

कोल्हापूर : कोल्हापूरला विमान सुरु व्हावे, यासाठी आता अंबाबाईलाच नवस करायला हवे. विमान सुरु करण्याचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. अनेकदा विमान सुरु होण्याच्या तारखा येतात, पण आता कोल्हापूरला विमान सुरु होईल. तेंव्हाच ते खरे होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली.

कोल्हापूरला विमानतळ आहे. पण येथे गेल्या अनेक वर्षापासून विमानसेवाच बंद आहे. कोल्हापूरला विमानसेवा सुरळीतपणे सुरु व्हावी, यासाठी अनेकदा प्रयत्न झाले आहेत. पण हे सर्व प्रयत्न यशस्वी झाले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात विमान सुरु होणार होते. याबाबत पत्रकारांनी पालकमंत्री पाटील यांना विचारले असता पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कोल्हापूरला विमान सुरु व्हावे, यासाठी आता अंबाबाईला नवसच करायला हवे. अनेकदा आपण यासाठी प्रयत्न करतोय. आता विमान सुरु करण्यासाठी होकार दिलेल्या डेक्कन कंपनीसोबत उद्या मंगळवारी (ता.12) चर्चा होणार आहे. विमानसेवा सुरु करायला कंपनी तयार आहे. पण वेळापत्रकाचा घोळ आहे. रात्रीची वेळ मिळाली आहे. ही वेळ चुकीची असल्याने आपण पुन्हा सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरु व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. विमानसेवा सुरु करणाऱ्या कंपन्यासोबत आपले चांगले संबध आहेत. यामध्ये आपल्याला नक्कीच यश येणार आहे. पण आता जोपर्यंत विमानसेवा सुरु होत नाही. तोपर्यंत तारखेचे आश्‍वासन देणार नाही. कोल्हापूरला विमानसेवा जेंव्हा सुरु होईल. तेंव्हाच ते खरे होणार आहे.'

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास