लोकसहभागातून पूनर्जीवित झालेला ओढा खळखळून वाहिला

शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

यंदा पावसाळा संपत आला तरी पाऊस होत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले होतेच आणि 15 हजार लोकवस्तीच्या गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.

महूद (जि. सोलापूर) : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत लोकसहभागातून 5 किलोमीटर ओढ्याचे पुनर्जीवन ग्रामस्थांनी केले. काल सांयकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा ओढा खळखळून वाहिला. शेतकरी जाम खूष झालेत.

आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी कामाचे लोकार्पण केले होते. यंदा पावसाळा संपत आला तरी पाऊस होत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले होतेच आणि 15 हजार लोकवस्तीच्या गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मागील वर्षी नीरा धरण कालव्याचे पाणी ओढ्यात सोडण्यात आले होते, त्याची पुनरावृत्ती होणार काय असा प्रश्न होता. पण हा ओढा एका पावसात तुडुंब भरला. ग्रामस्थ यांनी ओढ्याचे पाणी पाहण्यासाठी काठावर गर्दी केली आहे.

टीसीएसच्या माध्यमातून 42 किलोमीटर इतक्या अंतराच्या याच कासाळ ओढ्याच्या पुनर्जीवनाचे काम सुरू आहे. या वर्षी पूर्ण होईल, त्यातून सांगोला, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील 23 गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’