जलयुक्त शिवार योजनेतून शेतीसाठी शाश्वत पाण्याचे नियोजनः विजय औटी

सनी सोनावळे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

टाकळी ढोकेश्वर (नगर): दुष्काळी भागात दर दोन वर्षांनी नैसर्गिक कारणांनी निर्माण होणार्‍या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे. या योजनेतुन जलसंधारणांतर्गत उपाययोजनाद्वारे एकात्मिक पध्दतीने शेतीसाठी पाण्याचे नियोजन होणार आहे, असे प्रतिपादन आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले.

कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथे नव्याने खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्याचे पुजन आमदार औटी व जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांच्या हस्ते करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते.

औटी म्हणाले, 'या अभियानात विविध विभागाकडील योजना, अशासकीय संस्था आणि लोकसहभागातून अनेक मोठी कामे निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात पाणी अडविल्याने पाण्याची पातळी वाढत आहे. तालुक्यात या योजनेतून पाणलोटाची कामे झाल्याने गावांतील जलस्तर उंचावला आहे.'

यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, सरपंच साहेबराव वाफारे, पंचायत समिती सदस्य सरूबाई वाघ, बापू शिर्के, उपसरपंच कैलास उंडे उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :