संदीप गुंड यांना राष्‍ट्रीय आयसीटी अंतर्गत विशेष राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सुपे (नगर): मानव संशोधन विकास मंत्रालयाच्‍या वतीने शिक्षण विभागातील देशभरातील नाविन्‍यपुर्ण व विशेष कार्य करणा-या शिक्षकांना राष्‍ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्‍कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा आयसीटी अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार संदीप गुंड यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उपराष्‍ट्रपती व्‍यंकया नायडू यांच्‍या हस्‍ते गुंड यांना देऊन गौरविण्‍यात आले.

सुपे (नगर): मानव संशोधन विकास मंत्रालयाच्‍या वतीने शिक्षण विभागातील देशभरातील नाविन्‍यपुर्ण व विशेष कार्य करणा-या शिक्षकांना राष्‍ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्‍कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा आयसीटी अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार संदीप गुंड यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उपराष्‍ट्रपती व्‍यंकया नायडू यांच्‍या हस्‍ते गुंड यांना देऊन गौरविण्‍यात आले.

पाच सप्‍टेंबर डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍ण यांचे जन्‍मदिवशी जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा पष्‍टेपाडा जिल्हा ठाणे या पहिल्‍या डिजीटल शाळेचे शिक्षक गुंड यांना उपराष्‍ट्रपती नायडू यांचे हस्‍ते राष्‍ट्रीय आयसीटी पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. यावेळी मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्‍यमंत्री उपेंद्र कुशावार, सत्‍यपाल सिंग व शिक्षण सचिव अनिल स्‍वरुप उपस्थित होते. पुरस्‍कार स्विकारताना सदर कार्याचा विशेष परिचय प्रकाश जावडेकर व सचिव अनिल स्‍वरुप यांनी उपराष्‍ट्रपती यांना करूण दिला. गुंड हे मुळचे पारनेर तालुक्यातील वडगाव गुंड येथील रहीवाशी आहेत.

शिक्षणमंत्री विनोद तावडे व सचिव नंदकुमार यांच्‍या प्रेरणेने मी डिजीटल महाराष्‍ट्रासाठी कार्य करत आहे. सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात झालेल्‍या कार्यक्रमात सचिव स्‍वरुप यांनी राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांना माझ्या कार्याचा थेट उल्‍लेख करत राष्‍ट्रपतींची विशेष भेट करुन दिली. सदर भेटीत मी आपल्‍या डिजीटल शाळा अभियानाविषयी राष्‍ट्रपतींना माहिती दिली. यावर राष्‍ट्रपतींनी विशेष कौतुक केले व शुभेच्‍छा दिल्‍या. राष्‍ट्रपतींसोबत झालेली अनपेक्षित भेट माझ्यासाठी एक अविस्‍मरणीय क्षण होता. राष्‍ट्रपती, उपराष्‍ट्रपती, मानव संसाधन मंत्री सचिव या सर्वांन दिलेल्‍या प्रेरणेने पुढील कार्यासाठी न संपणारी उर्जा प्राप्‍त झाली आहे, असे पष्टेपाडा येथे प्राथमिक शिक्षक असलेले संदीप गुंड यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'

इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक

ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा

फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा

श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे

उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन

बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात

तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य

हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ

कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’