'कडबाकुट्टीत' अडकून शेतकऱ्याचा हात तुटला

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

संगमनेर तालुक्यातील दुर्घटना 

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील गुंजाळवस्ती शिवारात राहणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याचा डावा हात कडबाकुट्टीत अडकून तुटला व ते जबर जखमी झाले. रघुनाथ ठमाजी गुंजाळ (वय ६२) असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

तळेगाव दिघे येथील रघुनाथ ठमाजी गुंजाळ हे नेहमीप्रमाणे जनावरांना चारा तयार करण्यासाठी कडबाकुट्टीत कडवळ व मका चारा टाकत होते. दरम्यान चारा लोटत असताना त्याचा डावा हात कडबाकुट्टीत अडकला व आत खेचला जावून कोपरापर्यंत तुटला व ते जबर जखमी झाले. त्यांना युवक कार्यकर्ते संतोष दिघे व मच्छिंद्र दिघे यांनी तातडीने संगमनेर येथील नागरे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.

संपूर्ण हात निकामी झाल्याने डॉक्टरांनी खांद्यापासून हात काढून टाकण्याचा निर्णय घेतला. कडबाकुट्टीमुळे सदर शेतकऱ्यास आपला हात गमवावा लागला. या घटनेने कडबाकुट्टीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

Web Title: nagar news sangamner farmer looses hand in fodder cutter