शेतकरी चुलते-पुतण्यांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

संजय आ. काटे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

तारेला एकजण चिकटला त्यावेळी त्यांना सोडवायला गेलेला दुसराही चिकटला.

श्रीगोंदे (जिल्हा नगर) : तालुक्यातील लिंपणगावमधील शेंडेवाडी येथील दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

रामदास लक्ष्मण माने (वय 48) व शांताराम किसन माने (वय 31) हे दोघे चुलते - पुतणे होते. हे दोघे रविवारी सायंकाळी उसाच्या पिकावर तणनाशक फवारण्यासाठी गेले होते. विद्युत पुरवठा सुरू असतानाच विजेच्या तारा खाली पडलेल्या होत्या. त्या तारा लक्षात आल्या नाहीत.

तारेला एकजण चिकटला त्यावेळी त्यांना सोडवायला गेलेला दुसराही चिकटला. त्यावेळी शेतात पडलेल्या विजेच्या तारांचा झटका त्यांना बसला. त्यात ते दोघे मरण पावले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास