सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतीसाठी जोरदार रणधुमाळी

हेमंत पवार
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

थेट सरपंच निवडीने मोठी चुरस; स्थानिक पुढाऱी व नेत्यांच्या गटाची प्रतिष्ठा पणाला  

थेट सरपंच निवडीने मोठी चुरस; स्थानिक पुढाऱी व नेत्यांच्या गटाची प्रतिष्ठा पणाला  
कऱ्हाड (सातारा): जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे धुमशान सुरु झाले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या 319 ग्रामपंचायतीसाठी 16 ऑक्टोंबरला मतदान होत आहे. त्यामुळे संबंधित गावात रणधुमाळीला वेग आला आहे. मोठ्या ग्रामपंयातीचांचाही यामध्ये समावेश असल्याने तेथील स्थानिक पुढाऱ्यांसह त्यांना माणनाऱ्या नेत्यांचीही प्रतिष्ठा यातुन पणाला लागणार आहे. यंदा पहिल्यांदाच गावचा सरपंच थेट जनतेतुन निवडण्यात येणार असल्याने त्या पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने लोकनियुक्त सरपंच पदासाठी जोरदार सस्सीखेच दिसून येईल.

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच जाहिर केला. त्यामध्ये जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा समावेश आहे. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील 44, सातारा तालुक्यातील 38, जावली तालुक्यातील 15, कोरेगाव तालुक्यातील 52, पाटण तालुक्यातील 86, वाई तालुक्यातील 3, महाबळेश्वर तालुक्यातील 6, खंडाळा तालुक्यातील 2, फलटण तालुक्यातील 24, खटाव तालुक्यातील 15 आणि माण तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी 16 ऑक्टोंबरला मतदान होत आहे. ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन व्हावे या उद्देशाने गावा-गावातील विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डु ठोकून उभे ठाकले आहेत. सत्ताधाऱ्यांनी केलेली चांगले कामे जनतेपुढे मांडून आपलीच सत्ता कायम रहावी यासाठीही केलेल्या कामाची जाहिरात करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, संबंधितांना कोणती कामे गैरप्रकारे केली ही ऐन निवडणूकीच्या काळात मांडण्यासाठी विरोधकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली. त्यामुळे निवडणूकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच झडणार आहेत. त्यामुळे निवडणूक लागलेल्या गावांतील वातावरण चांगलेच तापले आहे. संबंधित निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये मोठ्या गावांचाही समावेश आहे. त्यामुळे तेथे स्थानिक पुढाऱ्यांसह त्यांना माणनाऱ्या नेत्यांचीही प्रतिष्ठा यातुन पणाला लागणार आहे. सध्या गावच्या पातळीवर आरक्षणनिहाय उमेदवार निवडीची कार्यवाही अंतिम टप्यात आली आहे. मात्र, पॅनलमधुन उमेदवारीतुनही मोठ्या गावात पॅनेलप्रमुखांना डावलायचे कोणाला यावरुन कसरत करावी लागत असल्याचेही चित्र आहे.

पालिकेच्या नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडल्यानंतर आता गावचा सरपंचही थेट जनतेतुन निवडण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्यात जिल्ह्यातील 319 गावांच्या सरपंचांची निवड होणार आहे. सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले आहेत. त्याचबरोबर तो किमान सातवी पास असला पाहिजे ही शैक्षणिक पात्रता गृहीत धरल्याने अनेक इच्छुकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ग्रामपंचायतीच्या आरक्षणासाठीचे सरपंचपदाचे आरक्षणही नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. सरपंच पदाच्या व्यक्तीवर अविश्वास ठराव आणता येणार नसल्याने त्या पदाला सुरक्षितताही मिळाली आहे. मात्र त्यांनी चुकीची कामे केली तर त्यांना कारवाईस सामोरे जावे लागणाल आहे. ग्रामपंचायतींना थेट निधी मिळणार असल्याने ग्रामपंचायतींना त्यासाठी अवलंबुन रहावे लागणार नाही. मात्र, त्याचा विनीयोग हा सरपंचांच्या मान्यतनेचे होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यापेक्षाही सरपंच पदाची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गावच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याने गावोगावच्या नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news satara district gram panchayat election