उरमोडीतून थेंबभरही पाणी सोडू देणार नाही...

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

साताराः धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक 10 ऑक्‍टोबरपर्यंत न झाल्यास उरमोडी धरणातून एक थेंबही पाणी सोडू देणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील उरमोडी धरणग्रस्त कृती समितीने आज (मंगळवार) पत्रकार परिषदेद्वारे दिला.

या समितीचे अध्यक्ष वसंतराव भंडारे म्हणाले, धरणग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्याबाबत जिल्हा प्रशासन बेफिकीर राहिले आहे. परळी खोऱ्यातील धरणग्रस्तांचे अद्याप 100 टक्के पुनर्वसन झालेले नाही, असा दावा भंडारे यांनी केला. ते म्हणाले, निगुडमाळ, ताकवली, वेणेखोल या गावांतील सुमारे 266 खातेदारांना अद्याप जमीन वाटप झालेले नाही. ईश्‍वर चिठ्ठीद्वारे जमिनीचे वाटप आम्हाला मान्य नाही. या व अन्य मागण्यांसाठी वारंवार बैठका होऊनही जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने 10 ऑक्‍टोबरपर्यंत पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री, आयुक्त यांनी प्रश्‍नांची सोडवणूक न केल्यास उरमोडी धरणातून एक थेंबही पाणी सोडू दिले जाणार नाही, असा इशारा भंडारे यांनी दिला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news Urmodit will not let the water drown too much