यंदापासून राज्य-जिल्हास्तरावर आपत्ती धोके निवारण दिवस

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

13 ऑक्‍टोबर ; शासनाच्या विविध विभागांचा असणार सहभाग

सोलापूर: यंदाच्या वर्षांपासून राज्य आणि जिल्हा पातळीवर आपत्ती धोके निवारण दिन साजरा केला जाणार आहे. 13 ऑक्‍टोबर रोजी साजरा होणाऱ्या या दिवसाच्या उपक्रमामध्ये आपत्तीशी संबंधित शासनाचे सर्व विभाग सहभागी होणार आहेत. 9 ते 13 ऑक्‍टोबर या कालावाधीत उपक्रम साजरे केले जाणार आहेत.

13 ऑक्‍टोबर ; शासनाच्या विविध विभागांचा असणार सहभाग

सोलापूर: यंदाच्या वर्षांपासून राज्य आणि जिल्हा पातळीवर आपत्ती धोके निवारण दिन साजरा केला जाणार आहे. 13 ऑक्‍टोबर रोजी साजरा होणाऱ्या या दिवसाच्या उपक्रमामध्ये आपत्तीशी संबंधित शासनाचे सर्व विभाग सहभागी होणार आहेत. 9 ते 13 ऑक्‍टोबर या कालावाधीत उपक्रम साजरे केले जाणार आहेत.

संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार 13 ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक आपत्ती धोके निवारण दिन म्हणून साजरा केला जातो. आपत्ती आणि धोके निवारण्यासाठी जनजागृती करण्यासाठी या दिवशी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. या
पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्यांना हा दिवस निरनिराळे उपक्रम घेऊन व रंगीत तालिम राबवून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आपत्ती धोके निवारण दिवस यंदा पहिल्यांदाच साजरा केला जाणार आहे. त्यानुसार 9 ते 13 ऑक्‍टोबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये निबंध, चित्रकला, पथनाट्य आयोजित केले जाणार आहेत. या कालावधीत ज्या शाळा, महाविद्यालयांना सुटी असेल किंवा परिक्षा असतील त्या ठिकाणी सुटी आणि परिक्षा संपल्यावर हे उपक्रम राबविले जाणार आहेत. हे उपक्रम आयोजित करण्यामध्ये गृह, सार्वजनिक आरोग्य, जलसंपदा, सहकार, नगरविकास, महापालिका  व इतर विभागांचाही सहभाग असणार आहे. त्यांनी आपल्या स्तरावर रंगीत तालीम व जनजागृती कार्यक्रम करणे बंधनकारक असणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी
आपला जिल्ह्यात कोणत्या आपत्ती प्राधान्याने जाणवू शकतात, त्या आपत्ती निवारणाचे प्रयोजन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधान्याने करावे लागणार आहे. या उपक्रमासाठी राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून खर्च केला जाणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास 

Web Title: solapur news Disaster Response Due to State-Districts this year