बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्यानेच घेतले 42 लाखांचे गृहकर्ज

रविंद्र जगधने
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पिंपरी : चिंचवड येथील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या गृहकर्ज कार्यालयात अज्ञात व्यक्तीने नरेश सिंह (वय 29, रा. पिंपळे सौदागर) यांच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती देऊन 42 लाखांचे कर्ज काढले. ही घटना फेब्रुवारी 2016 ते मार्च 2017 दरम्यान घडली असल्याचे समोर आले आहे. 

या प्रकरणी बँकेच्या गृहकर्ज विभागाचा व्हेरिफिकेशन कर्मचारी राहुल लोहार, कर्ज काढणारा अज्ञात व्यक्ती आणि वारस असलेल्या एका महिलेविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी नरेश सिंह यांचे पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, पगार पावती आदी कागदपत्रांच्या छायांकित प्रती कोठून तरी मिळवून त्याआधारे 42 लाखांचे गृहकर्ज मिळवले.

त्यासाठी नॉमिनी असलेल्या एका महिलेचा फोटो लावून नरेश यांच्या नावाचे खोटे कागदपत्रांद्वारे शिवाजीनगर येथील आयसीआयसीआय बँकेत खाते उघडले. या कर्जातील 42 लाख रुपयांची रक्कम थकीत आहेत. परिणामी नरेश यांचा सीबिल स्कोअर खराब झाला. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास