बारामतीत अवघ्या एक तासात 135 मिमी पावसाची नोंद

मिलिंद संगई
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

अतिवृष्टीचीच नोंद
एका दिवसात 65 मि.मी.हून अधिक पाऊस झाल्यास शासकीय नोंदीनुसार त्या भागात अतिवृष्टी झाली असे समजले जाते. बारामतीत तर अवघ्या एकाच तासात 135 मि.मी. पावसाची नोंद झाल्याने ही अतिवृष्टीच होती हेही आता समोर आले आहे. 

बारामती : शहर व तालुक्यातील अनेक भागांना काल रात्री उशीरा जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढल. पावसाचा जोर इतका होता की अनेक घरांसह इमारतींच्या तळघऱात पाणी साचून राहिले आहे. या पावसाने रात्री बारामती शहर पार जलमय होऊन गेले होते. अवघ्या एका तासात बारामती शहरात 135 मि.मी. इतक्या मोठ्या पावसाची नोंद झाली. 

रात्री आठनंतर शहरात पावसाला प्रारंभ झाला. हळुहळू पावसाचा जोर चांगलाच वाढत गेला आणि पाहता पाहता शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. आमराई, खंडोबानगर परिसरातील अनेक घरात रात्रीच्या पावसाने पाणी शिरले तर काही ठिकाणी बेसमेंटमधील गाळ्यातही या पावसाचे पाणी घुसले. 
रस्त्यावर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचून राहिल्याने दुचाकी व चारचाकी गाड्यांत हे पाणी शिरल्याने त्याही रस्त्यातच बंद पडल्या. मुंबईत मध्यंतरीच्या पावसाने जसे चित्र झाले होते. तसेच काहीसे चित्र बारामतीत रात्री पाहायला मिळाले.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासह अनेक नगरसेवक रात्री उशीरापर्यंत नागरिकांना मदत करत होते. अनेक ठिकाणी रात्री पाणी जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.
जळगाव सुपे येथे मल्लिकाबी इब्राहिम मुजावर यांच्या घरावर वीज पडून घराचे नुकसान झाले आहे, मात्र कसलीही जीवीतहानी झाली नसल्याचे तहसिलदार हनुमंत पाटील यांनी सांगितले. चोपडज येथील ओढाही काल भरुन वाहत असल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 

बारामती शहर व तालुक्यातील आज सकाळी आठ वाजताची पावसाची आकडेवारी आणि कंसात 1 जून पासून आजपर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढील् प्रमाणे- बारामती- 135 (एकुण 461), - 74 (249), सुपे- 54 (304), 
लोणी भापकर- 117 (461), बऱ्हाणपूर- 61 (376), सोमेश्वर कारखाना- 63 (186.4), पणदरे- 75 (369), जळगाव क.प- 45 (406), वडगांव निंबाळकर- 64 (262), मोरगांव- 66 (261), 8 फाटा होळ- 125.5 (298.5), उंडवड़ी क.प- 41 (109), माळेगाव कारखाना - 46.5 (198), माळेगांव कॉलनी- 83 (323), मानाजीनगर- 91 (322), चांदगुडेवाडी- 45 (441), काटेवाड़ी- 36 (331), सोनगाव- 142 (480), के.व्ही.के- 84.6 (397), कटफळ- 58

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’