...या चुकीला माफी नाही : विनोद तावडे

संतोष शाळीग्राम
गुरुवार, 1 जून 2017

पुणे: चांगले काम करताना चूक झाली, तर होऊदेत. पण हेतूत: केलेली चूक मान्य नाही. तसेच स्थानिक नेते, आमदार, खासदार यांच्या दबावाला बळी पडून चुकीचे काम करु नका. या चुकीला माफी नाही, अशी तंबी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गटशिक्षणाधिकार्यांना दिली.

तावडे यांनी राज्यातील गटशिक्षणाधिकार्यांशी संवाद साधला. त्यांनी केलेली चांगली कामे, त्यांना आलेल्या अडचणी समजून घेतल्या. याचवेळी त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नका, असे सांगितले.

स्थानिक नेता वा आमदार काही चुकीचे काम करायला सांगत असेल, तर त्याला नाही म्हणा. ते न केल्याने त्याचा त्रास होत असले तर वरिष्ठांना सांगा, सचिव, मंत्र्यांना सांगा. पण दबावाला बळी पडून चूक केली, तर त्याची जबाबदारी तुमची असेल, या चुकीला माफी नाही. शिक्षकांना जसे पुरस्कार देतो, तसेच दरवर्षी चांगले काम करणाऱया पाच गटशिक्षणाधिकार्यांना पुरस्कार देणार. यात आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही, असे तावडे यांनी सांगितले.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'
नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​
पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला