फिर्याद येण्याआधीच चोरट्याला हातकड्या

निलेश कांकरिया
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

वाघोली (पुणे): चोरीच्या अनेक घटना घडूनही त्यांचा तपास लवकर लागत नाही; मात्र चोरीची घटना घडल्यानंतर त्याची फिर्याद दाखल होण्यापूर्वीच चोराला जेरबंद करून ज्या महिलेची चोरी झाली त्याची माहिती काढण्यात लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले. वाघोली येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ओम बाळकृष्ण सातपुते (वय 32, सध्या रा. नाणेकरवाडी, खेड, मूळ रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे जेरबंद करण्यात केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक रविवारी पहाटे वाघोलीत गस्त घालत होते. या वेळी केसनंद फाटा येथील गोकुळ स्वीट होमच्या शेडमध्ये सातपुते संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे एक तुटलेले मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, बिल असा ऐवज आढळून आला. अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले. गुरुवारी (ता. 9) चाकण- शिक्रापूर मार्गावर प्रवास करत असताना महिलेच्या बॅगमधील सोन्याचे दागीने असलेला डबा व 14 हजार रुपये रोकड त्याने चोरली होती. पोलिसांनी बिलावरून त्या महिलेचा शोध घेतला. तिच्याशी संपर्क साधल्यानंतर तिने तो चोरटा व दागीने यांची ओळख पटविली. यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तो चाकण पोलिसांकडे वर्ग केला. पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाचे बाळासाहेब सकाटे, सदाशिव गायकवाड, समीर पिलाणे यांनी ही कामगीरी केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :