चाळीसगाव : गिरणा धरणाचा पाणीसाठा पोचला 35 टक्क्यांवर

शिवनंदन बाविस्कर
सोमवार, 24 जुलै 2017

पावसाळा सुरू झाल्यापासून धरणात आतापर्यंत 11 टक्क्यांनी वाढ झाली असून यापुर्वी 24 टक्के साठा होता. दरम्यान धरणात पाण्याची आवक सुरू आहे.

पिलखोड (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) : चणकापूर आणि पुनद धरण क्षेत्रात होत असलेल्या चांगल्या पावसामुळे गिरणात पाण्याची आवक सुरू असून, धरणाचा पाणीसाठा 35 टक्क्यांवर पोचला आहे, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

सध्या चणकापूर आणि पुनद धरणाचे एकत्रित मिळून 7 हजार 633 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग गिरणा धरणात सुरू आहे. धरणात उपलब्ध असलेल्या एकुण 9 हजार 468 दशलक्ष घनफुट पाणीसाठ्यापैकी 6 हजार 468 दशलक्ष घनफुट एवढा जिवंत  साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा 35 टक्क्यांवर पोचला आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून धरणात आतापर्यंत 11 टक्क्यांनी वाढ झाली असून यापुर्वी 24 टक्के साठा होता. दरम्यान धरणात पाण्याची आवक सुरू आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :