अकोला : बाळापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

अनिल दंदी
बुधवार, 26 जुलै 2017

गायगांव येथील विदर्भ ग्रामीण बँकेच्या शेटरचे कुलुप फोडले.तर पारस येथील गजबजलेल्या वस्तीतील कोकण बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न केला; परंतु बँकेतील रक्कम चोरून नेण्यात चोरट्यांना यश आले नाही.मात्र पारस येथील किरणा दुकान फोडून चार ते पाच हजार रुपयांवर डल्ला मारला.

अकोला : चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री बाळापूर, उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारस व गायगांव येथील बँक व किरणा दुकान फोडले.

गायगांव येथील विदर्भ ग्रामीण बँकेच्या शेटरचे कुलुप फोडले.तर पारस येथील गजबजलेल्या वस्तीतील कोकण बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न केला; परंतु बँकेतील रक्कम चोरून नेण्यात चोरट्यांना यश आले नाही.मात्र पारस येथील किरणा दुकान फोडून चार ते पाच हजार रुपयांवर डल्ला मारला.

मंगळवारी मध्यरात्री गायगांव येथील शेगांव-अकोला मार्गावरील येथील बसथांब्याच्या परीसरातील विदर्भ ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न केला; परंतु बँकेतील रक्कम चोरून नेण्यात चोरट्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी पारस येथे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवील्याचे सांगण्यात येते. 

पारस गावातील कोकण बँकेच्या शाखेचे पाठी मागील शेटर चोरट्यांनी वाकविले.मात्र आत प्रवेश करता आला नाही. मात्र येथील किरणा दुकानातून पाच हजार रुपये लंपास केले आहेत. आज सकाळी चोरीची घटना लक्षात आली. उरळ व बाळापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले असून चोरट्यांचा माग काढण्यात आला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

04.06 PM

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

04.06 PM

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

04.06 PM