व्यापाऱ्यांनो तपासणी करूनच दुकाने उघडा; अन्यथा होतील सिल!

Akola corona News Only open shops after checking by traders; Otherwise there will be seals!
Akola corona News Only open shops after checking by traders; Otherwise there will be seals!

मूर्तिजापूर (जि.अकोला) : स्वतःची, कामगारांची, वाहतूक करणारांची व अन्य संबंधितांची कोरोना तपासणी करवून घ्या, अन्यथा दुकाने सील करण्यात येतील, असा इशारा उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी आज शहरातील दुकानदारांना दिला.

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता शाससनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सामाजिक अंतर वा आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करून प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश आहेत. मात्र दुकाने व आस्थापना सुरू करण्यासाठी नियमांची कठोर चौकटआखून देण्यात आली आहे. प्रत्येक दुकानदाराला, त्यांच्या कामगार व वाहतूक संबंधीतांसह कोरोना चाचणी करवून घेणे आवश्यक आहे. सामाजिक अंतर राखण्याकडे कटाक्ष ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांसह सर्वांना मास्क असणे आवश्यक आहे. कोरोना चाचणी निगेटीव्ह असेल, तरच दुकान सुरू ठेवता येणार आहे.

उपविभागीय आधिकारी अभयसिंह मोहिते व मुख्याधिकारी विजय लोहकरे त्यासाठी आज रस्त्यावर उतरले. प्रत्येक दुकानात जाऊन त्यांनी या सर्व सूचना दिल्या व नियमांचा भंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला. कोरोना चाचणी न करता दुकान सुरू ठेवल्यास किमान ८ दिवसांसाठी दुकान सील करण्यात येईल, आशी तंबी त्यांनी दुकानदारांना दिली.
-----------------------------------------------------------------

दुकाने, प्रतिष्ठाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे, मात्र कोरोना चाचणीशिवाय नाही. कोरोना चांचणीविना उघडल्या जाणारे दुकान सील होईल. सामाजिक अंतर राखणेही तेवढेच आवश्यक आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
-अभयसिंह मोहिते. उपविभागीयअधिकारी, मूर्तिजापूर.
-----------------------------------------------------------------
कोरोना आजाराची वाढती पार्श्वभूमी लक्षात घेता शासन निर्देशानुसार मूर्तिजापूर शहरातील नागरिक, सर्व दुकानदार व्यापारी वर्गाची कोरोना स्वॅब तपासणी करण्याबाबत प्रशासनाने तसे निर्देश दिले आहेत. शनिवार, ता. ६ मार्च रोजी कोरोना स्वॅब तपासणी शिबिराचे जे. बी. हिन्दी न. पा. शाळा मूर्तिजापूर येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी स्वॅब देऊन तपासणी करून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे.
- विजय लोहकरे, मुख्याधिकारी, न.प.मूर्तिजापूर
-------------------------------------
अधिकाऱ्यांची तंबी अन् तपासणीसाठी रांगा
उपविभागीय आधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी तंबी देताच सजग झालेल्या शहरातील व्यापारी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील जे.बी.न.प.हिंदी विद्यालयात सुरू असलेल्या कोरोना तपासणी शिबिरात धाव घेऊन लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

 

 

 

 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com