Gram Panchayat Result :समान मते पडली, ईश्वर चिठ्ठीने माजी सरपंचाचा विजय, बाळापूर तालुक्यात नवीन चेहऱ्यांना संधी

Akola Marathi News Equal votes cast, victory of former Sarpanch by Ishwar Chithi, opportunity for new faces in Balapur taluka
Akola Marathi News Equal votes cast, victory of former Sarpanch by Ishwar Chithi, opportunity for new faces in Balapur taluka

बाळापूर (जि.अकोला) : तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत २ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ता. १५ जानेवारीला मतपेटीत बंद झाले हाेते. आज (साेमवार) मतमाेजणी झाली. या निवडणुकीत युवकांना मतदारांनी संधी दिली आहे.


हाती आलेल्या निकालांनुसार, तालुक्यातील भाजपचा विजयी घौडदौड सुरू आहे. अनेक जागांवर भाजप, वंचित आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, निमकर्दा येथील ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली असून नऊ पैकी नऊ जागांवर विजय मिळविला आहे.

मांडोली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत एका जागेवर दाेन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेत हा पेचप्रसंग सोडविला. एका छोट्या मुलाने काढलेल्या ईश्वर चिठ्ठीत मांडोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोपाल होनाळे यांचे नाव निघाले.

त्यानूसार निवडणुक निर्णय अधिकारी यांनी नावाची घोषणा केली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे माजी सरपंच यांचा विजय झाला. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत यांना समान मते मिळाली होती. त्यावेळी सुद्धा ईश्वर चिठ्ठीने पेच सोडवून विजय मिळविला होता. रिधोरा येथील ग्रामपंचायतीसाठी सभापती पती मंगेश गवई यांनी बाजी मारली आहे.

येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सहा जागांवर बाजी मारली. तर वंचितने चार, व सेनेने एक जागा काबीज केली. त्यामुळे रिधोरा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. उरळ येथे परीवर्तन पॅनेलने नऊ पैकी आठ जागा काबीज केल्या आहेत. हातरूण ग्रामपंचायत निवडणुकीत सखावत जागीरदार यांच्या पॅनेलचे तीन उमेदवारांनी विजय मिळविला.

तर एजाज खान यांच्या पॅनलच्या दोन जागा विजयी झाल्या. आठ जागांवर इस्लामी हिंद पॅनेलने बहुमत सिद्ध केले आहे. पारस ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून येथे केवळ वंचितला एक जागा मिळाली. तर सेनेने बारा जागांवर विजय मिळविला आहे. एमआयएमचे दोन तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

येथील सहा क्रमांकाच्या प्रभागात वंचितला एक जागा मिळाली. येथील माजी सरपंच पराभूत झाले आहेत. वाडेगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत वाडेगाव विकास आघाडीला सात, बहूजन विकास आघाडी पाच , परिवर्तन पॅनेलला चार तर अपक्ष उमेदवाराला एक जागा मिळाली.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com