घर बांधकामाला बसली महागाईची झळ

Akola Marathi News Influence of inflation on house construction
Akola Marathi News Influence of inflation on house construction

शिरपूर (जि.वाशीम) : 'लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून' अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. घर बांधणे खरेच एक दिव्य होऊन बसले आहे. सध्याच्या महागाईच्या काळात तर कर्जबाजारी होऊनच स्वहक्काच्या घरात प्रवेश करावा लागतो. मात्र असे असले तरी  मागील सहा महिन्यात बांधकाम साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे बांधकामाचा खर्च १५ ते २५ टक्क्यांनी अधिक वाढला आहे. परिणामी सामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे बहुतांश बांधकामाची गती मंदावली आहे. ज्यांनी करार पद्धतीने घर बांधण्यासाठी दिले आहे, त्यांची कामे करण्यास संबंधित कंत्राटदार टाळाटाळ करीत आहेत.


राहायला स्वतःच्या हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक वर्षाची मायापुंजी वापरून आणि नियोजन करून घराचे कामे हाती घेतले जाते. आता अशी बांधकामे हाती घेतलेले लोकांचे नियोजन कोलमडले आहे. परिसरात बरीचशी बांधकामे सुरू आहेत. त्यात वैयक्तिक बांधकामाची संख्या अधिक आहे.

यातील बहुतांश बांधकामे ही कोरोना काळाच्या आधी सुरू झालेली आहेत, मात्र आता लॉकडाऊन नंतर मागील काही महिन्यांत बांधकाम साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सिमेंटचे भाव वाढले, लोखंडाचे भाव प्रति क्विंटल एक हजार रुपयांनी वाढला आहे. लोखंडाचे तीन हजार ८०० रुपये होते ते आता चार हाजार ८०० रुपयांवर स्थिरावले आहेत.

त्यासोबतच स्थानिक पातळीवरील रेती उपलब्ध होत नसल्याने बांधकामासाठी चढ्या दराने रेती खरेदी करावी लागते. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. परिणामी बांधकामाचा खर्च वाढला आहे. वाढता खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे बरीच बांधकामे संथगतीने सुरू आहेत.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com