
कोरोनना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मूर्तिजापूर येथे कोरोना चाचणीचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात १९० लोकांच्या घशातील स्वॕब तपासणीसाठी पाठविण्यात आले.
मूर्तिजापूर (जि.अकोला) : कोरोनना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मूर्तिजापूर येथे कोरोना चाचणीचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात १९० लोकांच्या घशातील स्वॕब तपासणीसाठी पाठविण्यात आले.
कोविड तपासणी न करवून घेतल्यास विक्रीची परवानगी मिळणार नाही, असा इशाराही यावेळी फळ, फळभाजी विक्रेत्यांना देण्यात आला. शहराच्या सीमा बंद करून शहर बंदीस्त केल्यानंतर गर्दी आटोक्यात आणताच शहर कोरोना विरहीत करण्याच्या प्रयत्नात आज जे.बी.न.प.हिंदी विद्यालयात आयोजित कोरोना तपासणी शिबिरात १९० लोकांचे घश्यातील स्वॕब तपासणीसाठी घेण्यात आले.
एसडीओ, एसडीपीओ, सीओंनी शहरातून फेरफटका मारला. सर्व दुकानदार, व्यापारी, फळ, भाजी विक्रेते, वाहनचालकांना स्वॕब तपासणी करवून घेण्याबाबत सूचित केले. सर्व खासगी रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधून कोविड संशायीतांना तपासणी करवून घेण्यासाठी पाठविण्याबाबत सूचना दिल्या.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा संपादन - विवेक मेतकर
|
|||