esakal | पशुधन विकास मंडळ पोहचलं विधिमंडळात!

बोलून बातमी शोधा

Akola News Livestock Development Board reaches Legislature!}

पश्चिम विदर्भावरील अन्याय दूर करण्याच्या चर्चेसाठी महाराष्ट्र विधानसभा नियम ९७ अन्वये आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी (ता. ३ मार्च) स्थगन प्रस्तावाची सूचना महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाला दिली. अकोला येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय नागपूर येथे हलवून पश्चिम विदर्भावर होत असलेल्या अन्यायसंदर्भात सभागृहात चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.

पशुधन विकास मंडळ पोहचलं विधिमंडळात!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  पश्चिम विदर्भावरील अन्याय दूर करण्याच्या चर्चेसाठी महाराष्ट्र विधानसभा नियम ९७ अन्वये आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी (ता. ३ मार्च) स्थगन प्रस्तावाची सूचना महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाला दिली. अकोला येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय नागपूर येथे हलवून पश्चिम विदर्भावर होत असलेल्या अन्यायसंदर्भात सभागृहात चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.


संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ घेता येणे शक्य असतानासुद्धा अकोला येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय नागपूर येथे शासनाने स्थलांतरित केले. या मुद्यावर विधिमंळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा घडवून आणण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना सादर केली. वेळेअभावी आज चर्चा करता आली नसली तरी उद्या पुनश्च स्थगन प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे आमदार रणधीर सावरकरांनी स्पष्ट केले. प्रस्तावाचे समर्थनार्थ आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार आकाश फुंडकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार गोवर्धन शर्मा यांनी समर्थन केले आहे.
............
शासन आदेशच हास्यास्पद
मंडळाचे अकोल्यातील कार्यालय हे या भागाच्या दुग्ध व्यवसाय वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आले होते. असे असताना स्थलांतराचा आदेश काढताना नागपूर येथे विमानतळ आहे व केंद्रीय अधिकाऱ्यांना बैठकांना उपस्थित राहण्याचे सोयीचे होईल म्हणून कार्यालय अकोला येथून नागपूर येथे स्थलांतरीत करण्यात येत असल्याचा हास्यास्पद आदेश काढण्यात आला असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंग