esakal | मुख्य रस्त्यांपेक्षा अंतर्गत रस्त्यांवर वर्दळ

बोलून बातमी शोधा

Akola News More congested on internal roads than main roads}

 कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अकोला महापालिका क्षेत्रासह अकोट व मूर्तिजापूर शहरांमध्ये ८ मार्चपर्यंत टाळेबंदी वाढवण्यात आली आहे. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. परंतु रविवारी (ता. २८) शहरातील मुख्य रस्त्यांपेक्षा अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांची अधिक गर्दी दिसून आली. काही ठिकाणी तर चहा व किरकोळ व्यापाऱ्यांनी लपून व्यवसाय केल्याचे दिसून आले.

akola
मुख्य रस्त्यांपेक्षा अंतर्गत रस्त्यांवर वर्दळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अकोला महापालिका क्षेत्रासह अकोट व मूर्तिजापूर शहरांमध्ये ८ मार्चपर्यंत टाळेबंदी वाढवण्यात आली आहे. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. परंतु रविवारी (ता. २८) शहरातील मुख्य रस्त्यांपेक्षा अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांची अधिक गर्दी दिसून आली. काही ठिकाणी तर चहा व किरकोळ व्यापाऱ्यांनी लपून व्यवसाय केल्याचे दिसून आले.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात प्रत्‍येक रविवारी (शनिवारचे रात्री ८ वाजता पासून सोमवारचे सकाळी ६ वाजेपर्यंत) संपूर्ण संचारबंदी लागू करण्‍याचे आदेश दिले होते. या कालावधीत कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मुक्‍त संचार करण्यावर बंदी लावण्यात आली होती. परंतु शुक्रवारी (ता. २६) जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश जारी करत अकोला महापालिका क्षेत्रासह, अकोट व मूर्तिजापूर नगर पालिका क्षेत्रातील टाळेबंदी ८ मार्चपर्यंत वाढवली. त्यामुळे यापुढे शनिवार रात्रीपासून लागू होणारी संपूर्ण टाळेबंदी लागू राहणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते.

नागरिक व व्यापाऱ्यांनी नियमित निर्बंधांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले होते. परंतु रविवारी (ता. २८) शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांची गर्दी ओसल्याचे दिसून आले. वाहन चालक वाहन चालवत आपल्या गंतव्य स्थळी बेरोकटोक जाताना दिसून आले. परंतु शहरातील अंतर्गत रस्त्यांसह गल्ली-बोळीत मात्र नागरिकांची गर्दी होती
---------------
कोठे काय आढळले
- ताजना पेठ चाैक ते फतेह चाैक या दरम्यान नागरिकांची वर्दळ हाेती.
- फतेह चौकात चहा विक्रेता लपून छपून व्यवसाय करताना दिसून आले.
- जयहिंद चाैक, काळा मराेती राेड, डाबकी राेडवर वाहन चालकांनी गर्दी हाेती.
- मुख्य रस्त्यांना लागून असलेल्या अंतर्गत रस्त्यांवर अनेक नागरिक विना मास्क फिरताना दिसून आले.
- स्वीट मार्ट, हाॅटेल्समधून सध्या केवळ पार्सल सुविधा देण्याची परवागी व कमी गर्दी करण्याचे आदेश असल्यानंतर सुद्धा काही ठिकामी गर्दी दिसून आली.
- हातगाड्यांवर फळांचा ज्युस विक्री करणारे हाॅन्डग्लाेज व मास्कचा न करताच ज्युसची विक्री करताना दिसून आले.
------------
परीक्षा केंद्रांबाहेर गर्दी
रविवारी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत विविध रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. यावेळी शहरातील परीक्षा केंद्रांबाहेर परीक्षार्थी व त्यांच्या पालकांची गर्दी पाहायला मिळाली. याठिकाणी सुरक्षित अंतराचा नियमाचे उल्लंघन झाल्याचे सुद्धा दिसून आले.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंग